Success story: दिव्यांग असूनही तो हरला नाही...! आपल्यासारख्याच इतरांसाठी उभारलं दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पाहा पारस यांची यशोगाथा

Success story: दिव्यांगत्वाचे एकूण २१ प्रकार आहेत, आणि त्यामध्ये हिमोफिलियाचाही समावेश होतो. त्यामुळे या आजाराने प्रभावित मुलांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी पारस यांनी अथक प्रयत्न केले.
Success story
Success storysaam tv
Published On

पारस कोचेटा. दिव्यांगांसाठी काम करणारे, स्वतः दिव्यांग असूनही सदैव मदतीसाठी धावणारे..अनोखे व्यक्तिमत्त्व! पारस हे हिमोफिलिया या आजाराने त्रस्त आहेत. ८७ टक्के अपंगत्वाचा प्रकार. या आजारांत रक्त गोठण्याची क्रियाच होत नाही. यावर फारस फारसे वैद्‌यकीय उपचार नव्हते, तेव्हा पारस कोचेटा यांचं बालपण होतं. एखाद्या नाजूक काचेच्या भीड्याला जपावं, त्याही पेक्षा अधिक जपावं लागत होतं.

माहितीनुसार, हा आजार फार कमी लोकांना घेतो. शरीराला अजिबात इजा होता कामा नये, याची पुरेपूर काळजी काळत्री घ्यावी लागली. साहाजिकच बाहेर खेळायला किंवा शाळेत जायचं नाही, किती कठीण आहे. खेळण्या-बागडण्याचे, दंगामस्तीचे, पडल्या झडण्याचं बालपण पारस यांच्या वाट्याला आलं नाही. पण या गोष्टी बाजूला ठेऊन त्यांनी बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.

Success story
Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडून तरुणांनी सुरू केला चहाचा व्यवसाय; कमाई ऐकून थक्क व्हाल!

जे माझ्या वाट्याला आहे, ते इतरांना नको असा सामाजिक बांधीलकीचा विचार सतत करणाऱ्या पारस यांचा होता आणि त्यांनी दिव्यांगांसाठी काम करायचं ठरवले. हिमोफिलिया तसा क्लिष्ट आजार आहे. याबद्दल कोकांना फारशी माहिती नाही. ग्रामीण भागात तर आजिबातच नाही. म्हणूनच त्याबद्दल असलेले अज्ञान आणि गैरसमज दूर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असतात. त्यावरील औषधं आणि उपचार याबाबत त्यांनी मार्गदर्शन करायला सुरवात केली. दिव्यांगांचे २१ प्रकार आहेत. त्यामध्ये हिमोफेलिया येतो, त्यामुळे अशा मुलांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पारस यांनी खूप मेहनत घेतली. या आजारावर लातूरमध्ये उपचार होत नाहीत. म्हणून अशा मुलांना मुंबई, संभाजीनगरमध्ये वैद्यकीय मदतीसाठी पोहचवणं.

यासाठी ते अखंड प्रयत्न करतायत. स्थानिक पातळीवर उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला आणि त्याचा पाठपुरावा केला. यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. २०२३ पासून प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया डे केअर सेंटरची सुरवात साली. त्याचा फायदा कार्य मुलांना झाला आणि होईलही. हिमोफिलिया या आजारावरील नविन ओषधांची चाचणी करण्यासार्ग पुण्याचे डॉ, लोबडे यांना पेशंटची गरज होती. त्यावेळी पारस कोचेटा यांनी, पारस माझ्यावर कोणत्याही औषधाचा प्रयोग करा, पण औषधं त्यासाठी सर्वोपरी तयारी दाखवली. सुदैवाने ते प्रयोग यशस्वी होत आहेत.

Success story
Farmer Success Story: जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तरूण शेतकरी हरला नाही, 10 एकरात केली शेती, ३ बहिणींची लग्नेही केली

समाजाप्रती आपले ऋण लक्षात घेऊन, वृक्षारोपण, नेत्रदान, अवयवदान, जलसंधारण, पर्यावरण याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रमाने पारस यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यांनी दिव्यांग व्यक्तींची निवड केली. दिव्यांगांना मदत करताना मला आनंद होतो, असं ते म्हणतात. सध्याच्या, स्वतःपुरता विचार करणाऱ्या संकुचित माणसांच्या जगात असे समाजासाठी निस्वार्थीपणे काम करणारे लोकं फार कमी आहे म्हणूनच पारसजीचे कौतुक आहे.

पारस यांच्या या कृत्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ लातूरचा व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व्यवसात पुनर्वसन केंद्र लातूरला पुरस्कार, ध्येयपूती पुरस्कार फाउंडेशन यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. निव्हा दिमाग पुनर्वसन केंद्र तार लातूर-स्थानिक व्यवस्थान समितीचे सदस्य, समय या संस्थेचे कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र हिमोफिलिया फेडरेशनचे स्थानिक सदस्य पदांवर अशा विविध पारस काम करत आहेत.

Success story
Success story: दिव्यांग असूनही नताशा जोशीने जग जिंकलं; प्रेरणादायी कहाणी वाचून थक्क व्हाल

नूतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ- https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com