मध्यप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि बैतुलचे आमदार हेमंत खंडेलवाल यांच्या मुलीचे बुधवारी दुख:द निधन झाले आहे. सुरभि खंडेलवाल यांचे बैतुल या शहरात निधन झाले आहे. त्या 34 वर्षाच्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले की हार्ट अटकमुळे तिचा मृत्यू झाला आहे. ही निधनवार्ता समजताच कुटुंबासह पक्षात शोककळा पसरली आहे. हेमंत खंडेलवाल यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने नातेवाईक आणि पक्षाच्या कार्यकर्ते जमा झाले होते. सुरभि खंडेलवाल यांचे बैतुलमध्ये अंत्यविधी पार पडली. मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार हेमंत खंडेलवाल यांच्या मुलीचे ह्रदयविकारच्या झटक्याने निधन झाले. त्या बुधवारी सकाळी 11.30 वाजता फिजिओथेरपी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आणि काहीवेळातच त्यांचे निधन झाले. हेमंत खंडेलवाल हे बुधवारी सकाळी भोपाळमध्ये होते. मुलीचे निधनाबाबत समजताच ते घराकडे निघाले आणि घरी पोहोचले.
सुरभी खंडेलवाल ३४ वर्षांच्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना आरोग्याच्या समस्या होत्या. तेव्हापासून त्यांच्यावर नियमित उपचार सुरू होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांची काळजी घेत असे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार हेमंत खंडेलवाल यांच्या कन्या सुरभी खंडेलवाल यांच्या आकस्मिक निधनाबद्दल मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. शोकसंतप्त कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त करताना त्यांनी दिवंगत सुरभी यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बाबा महाकाल यांच्याकडे दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी आणि कुटुंबाला हे दुख सहन करण्यासाठी ताकद देवो अशी प्रार्थना केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.