Siddhi Hande
सध्या एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. याचसोबत एलपीजी गॅसच्या तुटवडादेखील आहे.
यामुळेच अनेकजणांनी इंडक्शनचा पर्याय निवडला आहे. इंडक्शनवर जेवण बनवत आहेत.
गॅस आणि इंडक्शनमध्ये कशावर जेवण बनवणे स्वस्त आहे असा प्रश्न गृहिणींना पडला आहे.
गॅसच्या तुलनेत इंडक्शनवर जेवण बनवणे जास्त महाग आहे. तुमचा खर्च जवळपास १३ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतो.
इंडक्शन स्टोव्हसाठी ८०-९० टक्के ऊर्जेचा वापर होतो. तर गॅससाठी फक्त ४० ते ५० टक्के ऊर्जेचा वापर होतो.
इंडक्शनसाठी स्टीलच्या भांड्याचा वापर केला जातो. यासाठी विशेष पद्धतीने भांडी तयार केली जातात.
इंडक्शनवर जेवण बनवण्यासाठी आधी तुम्हाला भांडी खरेदी करावी लागतील.याचा खर्च वाढणार आहे.
इंडक्शनवर जेवण बनवताना विजेचा जास्त वापर होतो. त्यामुळे गॅसच्या तुलनेत इंडक्शन जास्त महाग आहे.