Manasvi Choudhary
उन्हाळ्यात मसाला कैरी खाण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते. शाळेला सुट्टी लागली की पोरं मामाच्या गावी जातात आणि शेतात मस्त कैरी खाण्याचा बेत करतात.
हीच मसाला कैरी आता तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
बाजारातून मोठ्या आकाराच्या कैरी आणा आणि स्वच्छ धुवून लहान लहान तुकडे करा.
एका प्लेटमध्ये कैरीच्या कापलेल्या फोडी घ्या त्यावर हळद, मसाला, मिरी पावडर, काळे मीठ, पिठीसाखर हे मसाले घाला.
यानंतर सर्व मिश्रणात कैरीच्या फोडी मिक्स करा.
कैरी मसाल्यात मिक्स केल्यानंतर ती योग्य व्यवस्थित एकत्रित करा म्हणजे मसाला सर्व फोडींना लागेल.
जर तुम्हाला थोडी 'झणझणीत' चव हवी असेल, तर मसाल्यासोबत अर्धा चमचा कच्चे मोहरीचे तेल टाकून कैरीला फोडणी द्या यामुळे मसाल्याचा स्वाद कैरीत छान मुरतो.