Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कडक उन्हांमध्ये डोके तापते तसचे टाळू देखील लवकर तेलकट होतो अशावेळी केसांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात टाळूला थंडावा मिळण्यासाठी कोणते तेल लावावे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
खोबरेल तेल हे नैसर्गिकरित्या थंडावा देते यामुळे उन्हाळ्यात केसांना खोबरेल तेल लावून मालिश करा.
खोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस मिक्स करून तुम्ही ते देखील केसांना लावल्याने केसांच्या पेशींची वाढ होते.
बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन E आणि मॅग्नेशियम असते, जे केस गळती थांबवून केसांची वाढ होते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते, जे उन्हाळ्यातील 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस'पासून केसांचे रक्षण करते. केस पांढरे होण्यापासून देखील वाचवते.
उन्हाळ्यात केस धुण्याआधी १ ते २ तास आधी केसांना तेल लावावे रात्रभर केसांना तेल लावून ठेवू नका .