
परिस्थिती ही माणसाला सर्वकाही शिकवते. तुम्हाला आयुष्यात जर परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण आणि मेहनत हे दोनच पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. त्यामुळे खूप मेहनत करा तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तुम्ही खूप यशस्वी व्हाल. असंच काही आयएएस अनिल बसाक यांनी केलं.
परिस्थिती बदलून टाकली
अनिल बसाक यांचा जन्म खूप गरीब कुटुंबात झाला. त्यांना लहानपणापासूनच गरीबीत दिवस काढावे लागले. त्यांच्याकडे काही सुविधादेखील नव्हत्या. त्यांनी हीच परिस्थिती बदलली आणि यूपीएससी परीक्षा पास केली.
अनिल बसाक यांचा जन्म २ ऑगस्ट १९९५ रोजी झाला. त्यांनी किशनगंजच्या ओरिएंटल पब्लिक स्कूलमधून ८वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर १०वीपर्यंतचे शिक्षण अररिया पब्लिक स्कूल आणि १२वीपर्यंतचे शिक्षण बाल मंदिर येथून घेतले. १२वी पास झाल्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीत अॅडमिशन घेतले. आयआयटीमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. तेव्हा त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी तयापी केली. त्यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. परंतु त्यांना अपयश आले.
त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्यांना ६१६ रँक प्राप्त झाली.परंतु त्यांचे सिलेक्शन आयआरएस पदावर झाले. त्यानंतर सरकारी नोकरी केल्यानंतर त्यांनी १ वर्षभराची सुट्टी घेतली आणि पुन्हा परीक्षा दिली. २०२० मध्ये त्यांना २०वी रँक मिळाली. त्यानंतर ते आयएएस ऑफिसर झाले.
वडिलांचा संघर्ष पाहून केला निश्चय
अनिल बसाक यांच्या वडिलांचे शिक्षण फक्त चौथीपर्यंत झाले. परंतु त्यांनी कधीच आपल्या मुलांच्या शिक्षणात तडजोड केली नाही. त्यांचे वडील गावोगावी जाऊन कपडे विकायचे. त्याआधी ते हाउस हेल्पर म्हणून करायचे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.