
IAS सौम्या झा यांची सर्वत्र चर्चा
विद्यार्थ्यांसाठी सुरु केला पढाई विथ एआय उपक्रम
आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने दिली UPSC
प्रशासकीय सेवेत काम करण्याचे अनेक तरुणांचे स्वप्न असते. आयएएस, आयपीएस अधिकारी होऊन प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यूपीएससी परीक्षा द्यावी लागते. यूपीएससी परीक्षा (UPSC) ही खूप अवघड परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत जर तुम्ही यश मिळवले तर तुम्ही खूप मोठ्या पदावर काम करु शकतात. असंच काहीसं आयएएस सौम्या झा यांनीदेखील केलं आहे.
आयएएस सौम्या झा का आहेत चर्चेत? (IAS Saumya Jha Started Padhai With AI )
आयएएस सौम्या झा या नुकत्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या कामामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांची दूरदृष्टी त्यांना सर्वांपासून वेगळी बनवते. सौम्या यांनी टोंक जिल्ह्यात पढाई विथ एआय हा उपक्रम राबवला आहे. यामुळे राजस्थानमधील शिक्षण व्यवस्थेत नवीन बदल झाला आहे. या उपक्रमाअंतर्गत शाळांनी एआय जनरेटेड साधने सादर केली आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यांनी अनेक शाळांना भेटी घेतल्या. त्यानंतर मुलांसाठी हा उपक्रम राबवला.
कोण आहेत IAS सौम्या झा? (Who is IAS Saumya Jha)
आयएएस सौम्या झा या २०१७ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मूळच्या बिहारच्या आहेत. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. सौम्या यांनी बिहारमधून शिक्षण पूर्ण केले. यानंतर दिल्लीला एमबीबीएस करण्यासाठी गेल्या.
सौम्या यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. पण आई रेल्वे प्रवासात डॉक्टर सेवा द्यायची आणि वडील आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे त्यांनाही आयएएस व्हायचे होते. त्यांनी एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०१६ मध्ये पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.