Hingoli Zp : आयएएस अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करून पैसे हडपण्याचा प्रयत्न; हिंगोली जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार

Hingoli News : शासकीय कर्मचारी महिलेने शासनाच्या पैशाचा अपहार करण्यासाठी चक्क आयएएस अधिकाऱ्याची धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. या माध्यमातून लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे
Hingoli Zp
Hingoli ZpSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत कार्यरत एका महिला कर्मचारीने आयएएस अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करत लाखो रुपयांची रक्कम हडपण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्याचा हा प्रकार लक्षात आल्याने रक्कम खात्यात वर्ग करण्याचे राहिले. सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे. 

हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत सदरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका शासकीय कर्मचारी महिलेने शासनाच्या पैशाचा अपहार करण्यासाठी चक्क आयएएस अधिकाऱ्याची धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. या माध्यमातून लाखो रुपये हडपण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांना धनादेश वटवताना संशय आल्याने या महिलेचे बिंग फुटले आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

Hingoli Zp
Nanded : रिल्स बनवून व्हायरल करणे आले अंगलट; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

अकाउंट सेक्शनमधील महिला कर्मचारीचा कारनामा 

हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील अकाउंट सेक्शनमध्ये ही महिला कर्मचारी कार्यरत आहे. कनिष्ठ सहाय्यक पदावर असलेल्या सोनल चंद्रकांत जावळे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. अकाउंट सेक्शनमध्ये काम करत असल्याने या महिलेकडे शासकीय निधी ट्रान्सफर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे धनादेश येत असतात. यात काही चेक हे आयएएस अधिकाऱ्याचे देखील असतात. यातच या महिलेने आयएएस अधिकाऱ्याची स्वाक्षरी करण्याची सवय करून धनादेशावर बनावट स्वाक्षरी केली. 

Hingoli Zp
Nagpur : ओडिसातून गांजा तस्करी; नागपुरात मोठी कारवाई, २७ लाख रुपयांचा गांजा जप्त

महिलेवर दाखल करणार फसवणुकीचा गुन्हा 

दरम्यान या सगळ्या गंभीर प्रकारानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता या महिला कर्मचाऱ्याला नोटीस देत संपूर्ण प्रकरणाचा २४ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर या प्रकरणात स्वतः जिल्हा परिषदेच्या सीईओ अंजली रमेश यांनी लक्ष देत संबंधित महिलेविरोधात कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असून शासनाच्या रकमेचा बनावट स्वाक्षरीद्वारे अपहार करू पाहणाऱ्या या महिले विरोधात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सीईओ अंजली रमेश यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com