Nanded : रिल्स बनवून व्हायरल करणे आले अंगलट; तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Nanded News : सोशल मीडिया हे माध्यम एका रात्रीत स्टार बनवत असते. यामुळे अनेकांना सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिल्स, व्हिडीओ बनवून टाकण्याचे वेळ लागले आहे. प्रामुख्याने तरुण- तरुणींचे यात अधिक प्रमाण आहे
Nanded News
Nanded NewsSaam tv
Published On

संजय सूर्यवंशी 
नांदेड
: सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी आजकाल वेगवेगळे फंडे आजमावत रिल्स बनविले जातात. रिल्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत असतात. मात्र नांदेडमध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर टाकलेली रिल्स त्याच्या अंगलट आली असून हातात तलवार घेऊन रिल्स करून व्हायरल करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर नांदेडच्या इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सोशल मीडिया हे माध्यम एका रात्रीत स्टार बनवत असते. यामुळे अनेकांना सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रिल्स, व्हिडीओ बनवून टाकण्याचे वेळ लागले आहे. प्रामुख्याने तरुण- तरुणींचे यात अधिक प्रमाण आहे. परंतु फेमस होण्याच्या प्रयत्नात अनेकदा व्हायरल केलेला व्हिडीओ अंगलट येत असतो. असाच प्रकरण नांदेडमध्ये घडला असून तलवार घेऊन रिल्स करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. 

Nanded News
Amravati Medical Collage : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची नोटीस; पायाभूत सुविधा, शिक्षक कमतरतेवर ठेवले बोट

दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडीओ व्हायरल   
हातात तलवार घेऊन रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवनी येथील आलिम सलीम खा पठाण असं रिल्स बनवणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हातात तलवार घेऊन या तरुणाने अनेक रिल्स बनवल्या आणि ह्या रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या. लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. 

Nanded News
Jalna Civil Hospital : जमिनीवर गादी टाकून रुग्णांवर उपचार; जालना जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक चित्र

तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल 

दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध घेतला. यानंतर तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून तलवार देखील जप्त केली आहे. तर या तरुणावर बेकायदेशीर रित्या हत्यार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com