Amravati Medical Collage
Amravati Medical CollageSaam tv

Amravati Medical Collage : अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एनएमसीची नोटीस; पायाभूत सुविधा, शिक्षक कमतरतेवर ठेवले बोट

Amravati News : अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळाल्यानंतर मागील वर्षी महाविद्यालयाचे उद्घाटन झाले आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर जवळपास ४५० पदांची भरती करण्यास मंजुरी मिळाली
Published on

अमर घटारे 

अमरावती : मागील वर्षी सुरु झालेल्या अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच एनएमसीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाविद्यालयामध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा व शिक्षकांची रिक्त पदे यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात वर्षभरातच नव्यानं सुरु झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाला नोटीस बजावण्यात आली आहे. 

अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता मिळाल्यानंतर मागील वर्षी म्हणजे ऑक्टोम्बरमध्ये महाविद्यालयाचे उद्घाटन झाले आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर जवळपास ४५० पदांची भरती करण्यास मंजुरी मिळाली आहे. मात्र याठिकाणी अद्याप पुरेशी पदभरती झालेली नाही. परिणामी याठिकाणी अपूर्णता जाणवून येत असल्याचे एनएमसीच्या पाहणीत दिसून आले आहे. 

Amravati Medical Collage
Fake Fertilizer : नामांकित कंपनीच्या नावावर बनावट खताचा साठा; वाशिममध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई

राज्यातील सर्व महाविद्यालयांची पाहणी 

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांची तपासणी नुकताच महाराष्ट्र आयुर्वेद विज्ञान विद्यापीठाच्या पथकाकडून करण्यात आली आहे. या पथकांनी सादर केलेल्या अहवालात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांसह अन्य सर्व प्रकारच्या सुविधांची पाहणी करण्यात आली आहे. या मध्ये मोठी कमतरता दिसून आली होती. अर्थात एनएमसीने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे महाविद्यालयात सुविधा असणे अपेक्षित आहे.  

Amravati Medical Collage
Pandhapur Vitthal Mandir : तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन; रोज ३६०० भाविकांना मिळतेय प्रायोगिक तत्त्वावर टोकन दर्शन

तात्काळ भरतीचे आदेश 

शिवाय निकषाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा कमी शिक्षक वर्ग उपलब्ध असल्याचा धक्कादायक निष्कर्ष अमरावतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये पुढे आला आहे. त्यामुळे आयोगाने मेंटेनन्स ऑफ स्टॅंडर्ड मेडिकल एज्युकेशन रेगुलेशन २०२३ च्या कलम आठचा वापर करून नोटीस बजावले आहे. शिवाय तात्काळ शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com