Fake Fertilizer : नामांकित कंपनीच्या नावावर बनावट खताचा साठा; वाशिममध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई

Washim News : खरीप हंगाम सुरु होणार असल्याने कृषी केंद्रांकडून बियाणे व खत विक्रीसाठी मालाचा भरणा केला आहे. अनेक शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरवात झाली असून पिकांची वाढ झाल्यानंतर खत खरेदीला सुरवात
Fake Fertilizer
Fake FertilizerSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: खरीप हंगामाच्या तोंडावर वाशिमच्या कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. नामांकित कंपनीच्या नावावर बनावट खत भरून विक्रीसाठी तयार करत असताना भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ३०० क्विंटल बनावट खताचे पोते जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई वाशिम च्या मानोरा तालुक्यातील कारपा येथे करण्यात आली आहे. या कारवाईने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

खरीप हंगाम सुरु होणार असल्याने कृषी केंद्रांकडून बियाणे व खत विक्रीसाठी मालाचा भरणा केला आहे. अनेक शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीला सुरवात झाली असून पिकांची वाढ झाल्यानंतर खत खरेदीला सुरवात होईल. मात्र बनावट खते व बियाणे विक्रीचा सुळसुळाट सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारपा येथे तर नामांकित कंपनीच्या नावाने बनावट खतांचा साठा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

Fake Fertilizer
Bhandara : भंडाऱ्यात बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक; कालावधी उलटूनही भातपीक निघाले नाही

३०० क्विंटल खत जप्त 
वाशिमच्या भरारी पथकाला मानोरा तालुक्यातील कारपा येथे बनावट खत विक्रीसाठी आनल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून पथकाने कारपा येथील खताच्या साठ्यावर छापा टाकून साठा जप्त केला आहे. या कारवाईत तब्बल ३०० क्विंटल बनावट खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी नामांकित कंपनीच्या नावाच्या पोत्यात बनावट खत भरण्यात येत होतं.

Fake Fertilizer
Tiger Attack : सरपण आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाचा हल्ला; शेवरीमुंडा जंगलात अर्धवट अवस्थेत आढळला मृतदेह

एकाला घेतले ताब्यात 
दरम्यान कृषी विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत दिनेश गजानन चव्हाण (वय ३२) या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच या प्रकरणी मानोरा पोलिसात तक्रार दाखल करून साठा जप्त करण्यात आहे. दरम्यान कृषी विभागाकडून बनावट खत व बियाणे विक्रेत्यांवर यापुढे देखील कारवाई करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com