Police Recruitment Exam: पोलीस भरतीच्या परीक्षेत 'मुन्नाभाई एमबीबीएस', पेपरच्या वेळी पकडली भावी पोलिसाची चोरी

Police Recruitment Exam Cheating : परीक्षा हॉलमध्ये मोबाईल नेण्यास बंदी असतानाही एका उमेदवाराने ह़ॉलमध्ये मोबाईल वापरला. एक विद्यार्थी वॉशरूम वरून जाऊन आल्यानंतर सतत कानाला हात लावत होता.
Police Recruitment Exam
Police Recruitment Exam Cheating saam tv
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

पोलीस खात्यामध्ये दाखल होऊन भविष्यात कायद्याचे रक्षक बनू पाहणाऱ्या भावी पोलिसच कॉपी करताना आढळून आला आहे. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगड मिलिटरी स्कूल येथील परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला आहे. वर्गाबाहेर ठेवलेला मोबाइल ब्ल्यू-टूथद्वारे जोडून प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी सहकारी मित्राकडून ‘कानमंत्र’ घेणाऱ्या भावी पोलिसावर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मोबाइलवरून संपर्कात असलेल्याचाही पोलिस माग घेत आहेत.

मुंबई पोलीस दलातील चालक, कारागृह अशा पदासाठी आज मुंबईतील अनेक केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातून परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी मुंबईत विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते. आज चालक आणि कारागृह अशा दोन्ही पदांसाठी मुंबईच्या विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडल्या. त्यासाठी परीक्षा केंद्रांवर अनेक पीआय दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवला होता.

Police Recruitment Exam
Mumbai News: शिर्डीला जायची इच्छा अपूर्णच राहिली, पायी यात्रेदरम्यान मुंबईच्या पोलिसाचा मृत्यू

या परीक्षा केंद्रात मोबाइल तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स यंत्र घेऊन जाण्यास मनाई असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांनी वर्गाबाहेरील बॅगेतच आपले मोबाईल आणि स्मार्ट वॉच ठेवले होते. मात्र ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूल येथील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी वॉशरूम वरून जाऊन आल्यानंतर सतत कानाला हात लावत होता शिवाय तो काहीतरी पुटपुटत होता ही बाब परीक्षा पर्यवेक्षकाच्या ध्यानात आली.

Police Recruitment Exam
Kalyan News: पुण्यानंतर कल्याणमध्ये 'खाकी पॅटर्न', गुन्हेगारांची भरस्त्यात धिंड

पर्यवेक्षक आणि पोलिसांनी त्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची झडती घेतली असता या परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या कानात छोटे ब्ल्यू-टूथ आढळले व कॉपीचा हा प्रकार उघडकीस आला.

फसवणुकीच्या कलमांन्वये गुन्हा दाखल

पोलीस दलात भरती होऊन कायद्याचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या भावी पोलिसांकडून ब्लूटूथ द्वारे बाहेर मोबाईलवर असलेल्या आपल्या सहकारी मित्राला प्रश्न सांगून बाहेरील व्यक्ती मोबाइलवर त्याला उत्तरे सांगत होता. हा प्रकार उघडकीस येतात परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या सर्व वस्तू हस्तगत करण्यात आल्या असून उशिरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम १९८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com