
आयपीएस अधिकारी उमेश गणपत खांडाबहाले यांचा प्रवास
१२वीत नापास झाले तरी हार मानली नाही
२ वर्षे घरोघरी जाऊन दूध विकले
तिसऱ्या प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक
आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर फक्त मेहनत हा एकच पर्याय आहे. तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल तेवढं यश तुम्हाला मिळतं. सातत्य, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही काहीही मिळवू शकतात. असंच काहीसं आयपीएस अधिकारी उमेश गणपत खांडाबहाले यांनी केलं. त्यांनी आपल्या मेहनतीने यश मिळवले.
१२वीत नापास
महाराष्ट्रातील छोट्याशा गावात जन्माला आलेल्या उमेश यांनी आपल्या आईवडिलांचे नाव मोठे केले आहे. उमेश यांना १२वाच्या परीक्षेत २१ गुण मिळाले होते. त्यांना अपयश आले होते. या अपयशानंतर त्यांनी दूध विकायला सुरुवात केले. १२वीत नापास झाल्यानंतर त्यांना फॉर्मल शिक्षण सोडावे लागले. ते दूध विकण्यासाठी रोज नाशिकला जायचे. यानंतर त्यांनी खुल्या शालेय शिक्षणातून १२वीची परीक्षा पास केली. त्यानंतर कॉलेज पूर्ण केले.
ज्या विषयात नापास त्याच विषयात एमए केलं
उमेश गणत खंडाबहाले हे नाशिकला दूध विकायचे तेव्हा वाटेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ होते. त्यावेळी त्यांनी पुन्हा शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. त्यांनी बारावीनंतर बीएससी हॉर्टिकल्चरमध्ये प्रवेश घेतला. यानंतर केटीएचएम कॉलेजमधून एमए केले. ज्या विषयात नापास झाले त्याच विषयात त्यांनी एमए केले.
उमेश यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१२ मध्ये पहिल्यांचा यूपीएससी दिली. त्यात त्यांना यश आले नाही. २०१५ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले. त्यांच्या गावातील आयपीएस होणारे ते पहिले व्यक्ती आहेत. त्यांचा हा प्रवास हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.