दहीहंडीच्या सणाच्या दिवशीच काळानं घात केला, शाळेला सुट्टी असल्यानं दोघे पोहायला गेले, पण..., कुटुंबाचा आक्रोश

Chandrapur News : शाळेला सुट्टी असल्याने नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही दु:खद घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील टेकरी गावात घडली आहे.
Chandrapur
Chandrapursaam tv
Published On
Summary
  • नदीपात्रात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

  • शाळेला सुट्टी असल्याने पोहायला गेले होते.

  • मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत.

संजय तुमराम, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chandrapur : चंद्रपूरमधून एक दु:खद घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरच्या टेकरी गावामध्ये घडली आहे. जित वाकडे आणि आयुष गोपाले अशी मृत मुलांची नावे आहेत. सुट्टी असल्याने ते नदीवर पोहण्यासाठी गेले होते. नदीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

Chandrapur
Priya Berde : चिमटे काढले, गाल ओढले; कमरेत हात घालून... लक्ष्याच्या बायकोकडून गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी-दहीहंडी अशा सलग सुट्ट्यांमुळे काही मुलं नदीवर पोहण्यासाठी टेकरी गावाजवळील नदी घाटावर गेली होती. यातील जित आणि आयुष यांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती प्राप्त होताच सिंदेवाही पोलिसांनी मुलांचे मृतदेह पाण्यातून काढले आणि शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

Chandrapur
Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यात हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बसरत आहे. हवामान खात्याने पुढील ४-५ दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत, अनेकजागी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशात नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrapur
Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com