Priya Berde : चिमटे काढले, गाल ओढले; कमरेत हात घालून... लक्ष्याच्या बायकोकडून गंभीर आरोप; नेमकं काय घडलं?

Prreeya Berde Fb Comment : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी एका फेसबुक पोस्टवर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. यात त्यांनी काही वाईट अनुभव शेअर केले आहेत.
Priya Berde
Priya Berdex
Published On
Summary
  • जया बच्चन यांना चाहत्यासोबत वाईट अनुभव आला.

  • चाहत्याला धकलल्याने जया बच्चन यांना ट्रोल करण्यात आले.

  • या प्रकरणावर मराठी अभिनेत्रीने पोस्ट शेअर केले.

  • या पोस्टच्या कमेंटमध्ये प्रिया बेर्डे यांनी त्यांचे वाईट अनुभव सांगितले.

Marathi Actress : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये जया यांची परवानगी न घेता एकजण त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे येतो. यावर संतापलेल्या जया बच्चन यांनी चाहत्याला ढकलले. यावरुन जया बच्चन यांनी प्रचंड ट्रोल करण्यात आले. या प्रकरणावरुन हिंदीसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याचे वाईट अनुभव सांगितले.

प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले यांनी जया बच्चन यांच्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली. चाहत्यांसोबतचे त्याचे वाईट अनुभव मुग्धा यांनी फेसबुक पोस्टद्वारे शेअर केले. या फेसबुक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा आहे. या पोस्टवर अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी कमेंट केल्याचे पाहायला मिळते. प्रिया बेर्डे यांनी त्यांच्यासोबत घडलेले वाईट अनुभव शेअर केले.

Priya Berde
Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

जया बच्चन प्रकरणावर भाष्य करताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, खरंय असे अनेक अनुभव येत असतात, पण कोण समजून घेणार गं. एका हळदीकुंकुवाच्या कार्यक्रमासाठी मी गेले होते. तेव्हा तेथील बायकांनी माझ्या दंडाला चिमटे काढले, काहींनी माझे गाल ओढले. हात मिळवून माझ्या बोटातील अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला.

Priya Berde
Crime : सावत्र आईशी अश्लील कृत्य करताना पाहिलं, वडिलांनी मुलाला संपवून नदीत फेकून दिलं

खूप भयंकर अनुभव, काही बायकांना माझ्या खांद्यावर हात टाकायचो असतो. खांद्यावर हात टाकून माझ्यासोबत फोटो काढायचा असतो. काहींना तर माझ्या कमरेत हात घालून फोटो काढायचा असतो. सगळं डोक्यात जातं. आता मी ठामपणे नाही म्हणून सांगते. एक अंतर ठेवून फोटा काढा. त्यांना राग आला तर येऊ दे, अशी कमेंट प्रिया बेर्डे यांनी केली आहे.

priya berde
priya berdefb
Priya Berde
Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com