Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: दोनदा फेल, तिसऱ्यांदा दिली स्पर्धा परीक्षा, रिक्षाचालकाची लेक झाली डेप्युटी कलेक्टर

Success Story Of Ayesha Ansari: आयशा अन्सारीने तिसऱ्या प्रयत्नात मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यावर मात करुन तिने हे घवघवीत यश मिळवले आहे.

Siddhi Hande

मध्य प्रदेश लोक सेवा आयोग परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत अनेकांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत आयशा अन्सारी हिने खूप मोठ यश मिळवलं आहे. त्या आता लवकरच डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्यरत होणार आहे. तिच्या या यशाने कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. (Success Story)

आयशा अन्सारी यांनी १५७५ पैकी ८७६.५० गुण मिळवले आहे. त्यांनी मुख्य परीक्षेत १४०० पैकी ७५९.५० गुण मिळवले आणि मुलाखतीत १७५ पैकी ११७ गुण मिळवले आहे.

आयशा अन्सारी यांनी दोनदा मध्य प्रदेश लोक सेवा आयोगाची परीक्षा दिली होती. यात त्यांना यश मिळालं नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश मिळवले. आयशा यांच्या मेहनतीमुळेच त्या आज डेप्युटी कलेक्टर झाल्या आहेत. यामध्ये त्यांच्या आईवडिलांचेही खूप मोठे योगदान आहे. (Success Story Of Ayesha Ansari)

आयशा यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. तरीही त्यांनी या परिस्थितीवर मात करुन यश मिळवले आहे. त्यांच्या आईवडिलांनी कधीच आयशाला काहीच कमी पडून नाही दिले. आयशा यांचे वडील ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही तिने नेहमी अभ्यास केला. याच मेहनतीचे फळ तिला आज मिळाले आहे.

आयशा यांनी सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण प्रायव्हेट शाळेतून झाले. त्यानंतर १२वीपर्यंतचे शिक्षण शासकीय कन्या विद्यालयातून केले. त्यानंतर रीवा येथील महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath Shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT