Indian Army Job: परीक्षा नाही थेट भारतीय सैन्यात नोकरी; पगार २,५०,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भारतीय सैन्यात इंजिनियर पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.
Indian Army Job
Indian Army JobSaam Tv
Published On

आर्मीत नोकरी करुन देशसेवा करण्याची इच्छा असते. जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारतीय सेनेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

भारतीय सेनेत शॉर्ट सर्विस कमीशन (SSC)अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. अविवाहीत महिला आणि पुरुष या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. इंजिनियर ग्रॅज्युएट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Indian Army Job)

Indian Army Job
AIIMS Recruitment 2025: AIIMS मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी , 4576 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्या. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहे.

भारतीय सैन्यात ३८१ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.सिविल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल, मिसलेनियस इंजिनियरिंग स्ट्रीम या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. ३०० पेक्षा अधिक पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत. (Indian Army Recruitment 2025)

Indian Army Job
Government Job: परीक्षेशिवाय सरकारी नोकरी, पगार १५०००० रुपये; AAI मध्ये मेगा भरती,अर्ज कसा करावा?

भारतीय सैन्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षे असावे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंग पूर्ण केलेले असावे किंवा ते इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असावे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० ते २,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची ट्रेनिंग होणार आहे. त्यानंतर शेवटी त्यांची निवड केली जाणार आहे.

Indian Army Job
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com