Government Job: परीक्षेशिवाय सरकारी नोकरी, पगार १५०००० रुपये; AAI मध्ये मेगा भरती,अर्ज कसा करावा?

AAI Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.
Government Job
Government JobSaam TV
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

आर्चरी एसोसिएशन ऑफ इंडियामध्ये प्रोग्राम हेड, बायो-मेकॅनिक, यंग प्रोफेशनल (जनरल) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदासाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावेत. (Government Job)

Government Job
Railway Jobs: १०वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, ४००० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; अर्ज कसा करायचा?

या नोकरीबाबत सविस्तर माहिती sportsauthorityofindia.nic.in वर देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे. त्यामुळे तरुणांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

एएआयमध्ये ४ रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. प्रोग्राम हेड, बायो-मेकॅनिक, यंग प्रोफेशनल, मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी भरती केली जाणार आहे.प्रोग्राम हेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावी. यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. बायो-मेकॅनिक्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ४० वर्षे असावी. तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा ३५ वर्षे असावी. (AAI Recruitment 2025)

Government Job
Railway Jobs: १२वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, रेल्वेत भरती सुरु, अर्ज कसा करावा?

प्रोग्राम हेड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला १,५०,००० रुपये पगार मिळणार आहे. बायो मेकॅनिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ७५,००० रुपये पगार मिळणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी ५०,००० रुपये तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरुन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज recruitment.archery@gmail.com या मेलवर पाठवायचा आहे.

Government Job
Canara Bank Job: कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी, मिळणार १,५०,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com