Canara Bank Job: कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची संधी, मिळणार १,५०,००० रुपये पगार; पात्रता काय? जाणून घ्या

Canara Bank Recruitment 2025: कॅनरा बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Canara Bank Job
Canara Bank JobSaam Tv
Published On

बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँकेत सध्या नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. कॅनरा बँकेत ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॅनरा बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

कॅनरा बँकेतील स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ६ जानेवारीपासून तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्ही canarabank.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०२५ आहे. (Canara Bank Recruitment)

Canara Bank Job
CIDCO Job: सिडकोमध्ये नोकरी अन् १७१००० रुपये पगार; पात्रता काय? अर्ज कसा करावा?

कॅनरा बँकेत डेटा ॲनालिस्ट, डेटा मायनिंग, डेचा सायंटिस्च, ॲप्लिकेशन डेव्हलपर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आयटी ऑफिसर, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरसह अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. (Canara Bank Jobs)

कॅनरा बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवाराने ग्रॅज्युएशन, बी.ई/बीटेक किंवा आयटीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

Canara Bank Job
Government Job: १०वी पास ते पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; निती आयोगात भरती सुरु; अशा पद्धतीने करा अर्ज

कॅनरा बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ असावी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. या नोकरीसाठी उमेदवारांना १८ लाख ते २७ लाख रुपये पॅकेज आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना प्रत्येक महिन्याला १,५०,००० रुपये ते २,२५,००० रुपये पगार मिळणार आहे. हे वेतन तुमचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेवर असेल.

Canara Bank Job
Anganwadi Jobs: अंगणवाडीत बंपर भरती! ५ वी ते १२ वी पास महिला करु शकतात अर्ज; वाचा संपूर्ण प्रोसेस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com