Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

Indian Oil Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये २०० अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
Indian Oil Job
Indian Oil JobSaam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.इंडियन ऑइलमध्ये सध्या भरती सुरु आहे. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. iocl.com या वेबसाइटवर या नोकरीबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. (Indian Oil Recruitment)

Indian Oil Job
Railway Jobs: १२वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, रेल्वेत भरती सुरु, अर्ज कसा करावा?

इंडियन ऑइलमध्ये तब्बल २०० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत.

इंडियन ऑइलमध्ये ट्रेड अप्रेंटिस पदासाठी ५५ जागा रिक्त आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी २५ जागा तर ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी १२० जागा रिक्त आहेत. (Indian Oil Jobs)

ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन केलेले असावे.

अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २४ असावे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केलेली असावी. यानंतर मेडिकल फिटनेस टेस्ट केली जाणार आहे.

Indian Oil Job
Government Job: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी; BRO मध्ये कुक, मेस्त्रीसह विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने NAPSNATS या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही.

Indian Oil Job
UCO Bank Jobs: युको बँकेत नोकरीची संधी; २५० रिक्त जागा; अर्ज कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com