
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे.बीआरओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीआरओमध्ये एमएसडब्ल्यू कुक, राजमिस्त्री, लोहार अशा पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ११ जानेवारीपासून सुरु झाली आहे. (BRO Recruitment)
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील या नोकरीबाबत अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी marvels.bro.gov.in वर जाऊन अर्ज करावा.
आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपुर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, लडाख,हिमाचल प्रदेश येथे होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही ११ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करु शकतात.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधील ही भरती जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्ससाठी आहे. यामध्ये करंट आणि बॅकलॉग दोन्ही पद्धतीच्या रिक्त जागा आहेत. कुक पदासाठी १५३ जागा रिक्त आहे. मिस्त्री पदासाठी १७२ जागा आहेत. लोहार पदासाठी ७५ जागा आहेत. मेस वेटर पदासाठी ११ जागा रिक्त आहेत.एकूण ४११ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
बीआरओमधील या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी पास असणे गरजेचे आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी १८ ते २५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवारांना लेखी परीक्षा, पीईटी, प्रॅक्टिकल टेस्ट आणि वैद्यकीय चाचणी द्यावी लागणार आहे.
या नोकरीसाठी फक्त पुरुष उमेदवार अर्ज करु शकतात. त्यांना फिजिकल टेस्टसाठी GERF,सेंट्र, डिग्गी कॅम्प, आळंदी रोड, पुणे ४११०१५ येथे बोलवले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.