PCMC Recruitment: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सरकारी नोकरीची संधी; पगार ४०,०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. दिव्यांग भवनाच्या देखभालीसाठी ही भरती केली जाणार आहे.
PCMC Recruitment
PCMC RecruitmentSaam Tv
Published On

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. पीसीएमसीअंतर्गत दिव्यांग भवनाच्या संचलनासाठी पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दिव्यांग फाउंडेशनद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (PCMC Recruitment)

PCMC Recruitment
MPSC Recruitment: MPSC च्या २२५ जागांसाठी भरती, उद्यापासून अर्ज भरता येणार, पात्रता काय?

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कॉमप्युटर ऑपरेटर, लिपिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ३५,००० ते ४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सिनियस स्पीच थेरपिस्ट, सिनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनिअर ऑडिओलॉजिस्ट, सिनियर प्रोस्टेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, लिपिक आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Pimpri Chinchwad)

PCMC Recruitment
Bank Jobs: बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर होण्याची संधी; मिळणार १,३५,००० रुपये पगार; अर्ज कसा करावा?

१० रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने सर्व कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. त्यांनी संबंधित क्षेत्रात केलेली पदवी याबाबतची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

यानंतर मुलाखतीसाठी तुम्हाला २२ जानेवारी २०२५ रोजी उपस्थित राहायचे आहे. नवीन थेरगाव हॉस्पिटल, सेमिनार हॉल, चौथा मजला, जगताप नगर, थेरगाव पोलिस चौकी समोर, पुणे ४११ ०३३ येथे उपस्थित राहायचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही अधिसूचना वाचा.

PCMC Recruitment
Indian Oil Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार इंडियन ऑइलमध्ये नोकरी; २०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा कराल?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com