
अमोल मोटघरे, साम प्रतिनिधी
सावकाराच्या जाचाला कंटाळून एका जोडप्याने आपल्या पोटाच्या मुलाचा खून करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात यात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला तर पती थोडक्यात बचावलाय. राज्याला हादरून सोडणारी ही घटना पिंपरी चिंचवडमधील चिखलीत घडलीय. चिखली पोलिसांच्या सतर्कतमुळे पतीचा जीव वाचला.
चिखलीतील सोनीगरा नीलांगन हाऊसिंग सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. या दुर्दैवी घटनेत पत्नी शुभांगी वैभव हांडे वय 36 वर्ष आणि मुलगा धनराज वैभव हांडे या दोघांचा मृत्यू झालाय. तर पती वैभव मधुकर हांडे थोडक्यात बचावला. या घटनेनंतर चिखली पोलिसांनी संबंधित लोकांविरोधात गुन्हा दाखल केलाय. हांडे कुटुंबीय सामुहिक आत्महत्या प्रकरणात चिखली पोलिसांनी संतोष पवार, जावेद खान आणि एका महिला सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हांडे कुटुंबीयांनी संतोष पवार, जावेद खान आणि एका महिला सावकाराच्या कडून दहा टक्के व्याजाने जवळपास १० लाख रुपये कर्ज घेतल होतं. त्यातील त्यांनी जवळपास ९ लाख ५० हजार इतकी मुद्दल रक्कम देखील परत केली होती. सावकारांनी आपल्या मालकीची एक एकर जमीन आणि २० गुंटे जागा देखील लिहून दिली होती. त्यानंतरही सावकाराकडून हांडे कुटुंबीयांचा छळ केला जात होता. अश्लील शिवीगाळ आणि वारंवार धमकावलं जात होतं.
त्यामुळे बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून हांडे कुटुंबियांनी सामुहिक आत्महत्या करण्याचं पाऊल उचललं. सामुहिक आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मुंबई येथे राहणाऱ्या आपल्या एका १४ वर्षांच्या मुलाला सुसाईड नोट देखील पाठवली. हांडे कुटुंबियांनी केलेल्या सामुहिक आत्महत्याच्यां प्रकरणामुळे चिंचवड शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सावकारांकडून अनेकांचं आर्थिक शोषण होत असते. सावकार मोठ्या व्याजदरात कर्ज देत असतात. त्यामुळे कर्ज फेडण्यात अनेकांना अडचणी येत असतात. त्यातून सावकार वसुलीसाठी त्यांना वारंवार धमकावत असतात. हांडे कुटुंबियांनीही आपल्या गरजेसाठी कर्ज घेतलं होतं. परंतु पैसे परत करू शकले नसल्याने सावरकाराकडून त्यांचा छळ केला जात होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.