
संभाजी थोरात, साम प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वीडणी गावात अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आलीय. ऊसाच्या शेतात शीर धडापासून वेगळे केलेला महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाजवळ लिंबू, मिरची आणि हळदी कुंकु आढळलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले.
ऊसाच्या शेतात या अज्ञात महिलेचा मृतदेह सापडलाय. या मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेत. मृतदेह असलेल्या ठिकाणी एका फडक्यावर हळदी कुंकू काळी बाहुली तसेच महिलेचे केस सापडल्यामुळे परिसरात अघोरी प्रकारातून खून केल्याची चर्चा विडणी गावात सुरू झालीय. पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात हा प्रकार समोर आलाय. ऊसाच्या शेतात कपड्यावर साडी हळदीकुंकू काळी बाहुली महिलेचे केस,सुरा आढळून आल्याने खळबळ उडालीय.
या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगळे केलेला मृतदेह आढळून आलाय. घटनास्थळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केलाय. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप जाधव नावाच्या व्यक्तीला आधी मृतदेह दिसून आला. ते त्यांच्या उसाच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. दरम्यान तांत्रिक बुवाबाजी करणाऱ्याकडून असे गुन्हे होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी तंत्रमंत्राचा धाक दाखवून महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मु्ंबईतील आरे कॉलनी परिसरातही अशीच भयानक घटना घडल्याचं समोर आलं होतं. एका भोंदू बाबाने पतीचा आजार बरा करण्याच्या नावावर एका ३७ वर्षीय महिलेवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याने त्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही अत्याचार त्याने केला होता.
हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारू अशी धमकीही या बाबाने महिलेला दिली होती. याप्रकरणी आरे पोलिसांनी भोंदूबाबा राजाराम यादवला अटक केली.
काही दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात जादूटोणाचा प्रकार केल्याचं समोर आलं होतं. रात्रीच्यावेळी रस्त्याच्या मधोमध लिंबू, दोरा ठेवण्यात आले आहेत. या प्रकाराने नागरिक भयभीत झाले होते. अंबरनाथमधील शिवगंगा नगरमध्ये हा प्रकार समोर आला होता. प्रकार पाहून काही नागरिक घाबरून दूर पळून गेले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.