
बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोकं आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केलाय.१४ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे. त्यानंतर हा सर्व प्रकार दडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उलघडवत वडील विजय गणेश भंडलकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडलकर आणि संतोष सोमनाथ भंडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. आजीकडून घटना दडपण्याचा प्रयत्न,दिली खोटी माहिती वडील विजय भंडलकर यांनी मुलगा पियुष याला त्याचे तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जावून माझी इज्जत घालवणारा दिसतोय, असे म्हणत त्याला हाताने मारहाण केली. राग अनावर झाला अन् त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटले यात त्याचा मृत्य झाला.
पियुष याची आजी हे सर्व पाहत होती पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही.त्यानंतर विजय याच्या सांगण्याप्रमाणे पियुष हा चक्कर येवून पडला आहे, अशी खोटी माहितीही तिने दिली. मुलगा चक्कर येवून पडल्याचा बनाव रचला. त्यानंतर संतोष भंडलकर याने डाॅ. भट्टड यांच्या दवाखान्यात पियुषला नेल्यानंतर तेथे विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येवून पडल्याची खोटी माहिती दिली. डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून जाण्याचा सल्ला दिला.
मात्र त्यांनी मुलाला तिथे नेलेच नाही. याउलट मयताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही काहीही न सांगत नातेवाईकांना बोलावून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे शवविच्छेदन न करता थेट अत्यंविधीची तयारी केली. पोलिसांना खबऱ्याकडून ही माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.