
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एनटीपीसीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एनटीपीसीमध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
एनटीपीसीमधील या नोकरीबाबत अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर माहिती दिली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. एनटीपीसीमध्ये ८ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी २०२५ आहे. या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. (NTPC Recruitment 2025)
एनटीपीसीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेले असावे. याचसोबत कामाचा अनुभवदेखील असावा. या नोकरीबाबत सविस्तर माहिती लवकरच अधिकृत वेबसाइटवर दिली जाईल.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिसूचनेत दिली जाईल. (Government Job)
अर्ज कसा करावा?
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी careers.ntpc.co.in या वेबसाइटवर जावे.
यानंतर सीनियर एक्झिक्युटिव्ह भरती २०२५ वर क्लिक करा.
यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा.
यानंतर अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा. या अर्जाची कॉपी तुमच्याजवळ ठेवा.
स्टेट बँकेत नोकरी
सध्या स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. स्टेट बँकेत पीओ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२५ आहे. या नोकरीबाबत अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड प्रिलियम्स आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाणार आहे. या परीक्षेत पास झाल्यावरच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.