ITR Filling 2025 Saam Tv
बिझनेस

ITR Filling: मुदतीनंतर आयटीआर फाइल केल्यावर भरावा लागणार दंड; होम लोन, व्हिसावरदेखील होणार परिणाम

ITR Filling 2025: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे त्याआधी आयटीआर फाइल करणे गरजेचे आहे. जर तुम्ही त्याआधी आयटीआर फाइल केला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

Siddhi Hande

आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत

आयटीआर मुदतीनंतर फाइल केल्यावर भरावा लागतो दंड

आयटीआर उशिरा फाइल केल्यावर तुमचे होऊ शकते नुकसान

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी आयटीआर फाइल केले आहेत. याचसोबत अनेकांना रिफंडदेखील जमा झाले आहेत. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख यंदा वाढवून देण्यात आली आहे. आता आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांनी मुदतीपूर्वी आयटीआर फाइल करावे. जर तुम्ही त्यानंतर आयटीआर फाइल केला तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

जर तुम्ही मुदतीनंतर आयटीआर फाइल केला तर बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ असणार आहे. परंतु तुम्हाला यावर व्याज आणि दंड भरावा लागेल. यामुळे तुमचे नुकसान होणार आहे. दरम्यान, तुम्हाला किती दंड भरावा लागेल ते जाणून घ्या.

बिलेटेड आयटीआर फाइल करण्यासाठी लागणार व्याज

जर तुम्ही १५ सप्टेंबरनंतर आयटीआर फाइल केला तर त्यावर कलम 234A अंतर्गत टॅक्सवर १ टक्के व्याज भरावे लागणार आहे. याचसोबत तुमच्या रक्कमेवर दंड निश्चित केला जातो. तो भरावा लागतो.

किती दंड भरावा लागणार

तुमचे जर वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ५००० रुपये दंड भरावा लागेल. जर तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर १००० रुपये दंड भरावा लागेल.

जर तुम्हाला शेअर मार्केट, म्युच्युअल फंडमध्ये कोणतेही नुकसान झाले असेल तर ते तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही. जर तुम्ही मुदतीपूर्वी आयटीआर भरला तर तुम्ही हे नुकसान फाइल करताना भरु शकतात.

फायनान्शियल हिस्ट्रीवर होणार परिणाम

जर तुम्ही वेळेवर आयटीआर फाइल केला नाही तर त्याचा परिणाम तुमच्या फायनान्शियल क्रेडिबिलिटीवर होणार आहे. यामुळे बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन घेताना तुमच्याकडे आयटीआर कॉपी मागितली जाते.

तसेच जर तुम्हाला परदेशात फिरायला जायचे असेल तर तुम्हाला व्हिसासाठी अप्लाय करावे लागते. यावेळीही आयटीआर कागदपत्र आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आयटीआर नसेल तर तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख कोणती ?

आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ आली आहे.

जर १५ सप्टेंबरनंतर आयटीआर फाइल केला तर काय होईल?

१५ सप्टेंबरनंतर आयटीआर फाइल केल्यास तो ‘बिलेटेड आयटीआर’ मानला जाईल. यासाठी तुम्हाला कलम 234A अंतर्गत १% व्याज आणि दंड भरावा लागेल.

किती दंड लागतो?

  • उत्पन्न ₹५ लाखांपेक्षा जास्त – ₹५००० दंड

  • उत्पन्न ₹५ लाखांपेक्षा कमी – ₹१००० दंड

वेळेवर आयटीआर न भरल्याने काय नुकसान होऊ शकते?

  • फायनान्शियल क्रेडिबिलिटी कमी

  • लोनसाठी अडचण

  • व्हिसा प्रक्रियेत समस्या

  • शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड तोट्याचा फायदा कॅरी फॉरवर्ड करता येणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar: धाराशीवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

Maharashtra Politics : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? साडेसाती टाळण्यासाठी कृषीमंत्री शनिचरणी?

Maharashtra Live News Update: पावसाळ्यात बीडमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी खड्ड्यातील पाण्यात "होडी चलाव" आंदोलन

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

SCROLL FOR NEXT