
जर तुम्हाला म्युचल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर, तुम्ही तुमचे Bank Account, किंवा Demat Account उघडून ते करू शकता. म्युचल फंडमध्ये जोखीम असली तरी, प्रत्येक महिन्याला ५०० रुपये गुंतवून बचत सुरू करता येते. Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्यासाठी घरबसल्या KYC पूर्ण करण्याची प्रक्रिया खालील प्रमोणे.
काही Mutual Fund कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांचे KYC पूर्ण करण्यासाठी इंडिया पोस्टशी करार केला आहे. देशातील सर्वात मोठ्या म्युचल फंडपैकी एक असलेल्या निप्पॉन इंडियाचाही समावेश आहे.
ही सिस्टम कशा प्रकारे काम करते?
या पार्टनरशिपद्वारे, भारतीय पोस्ट त्यांच्या ग्राहकांना घरोघरी पडताळणीची सुविधा देईल. म्युच्युअल फंड गुंतवणुकीबद्दल जनजागृती वाढवणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. या पार्टनरशिपद्वारे भारतीय पोस्ट ग्राहकांना घरोघरी केवायसी पडताळणीची सुविधा देईल. भारतीय पोस्ट देशाच्या दूरच्या भागांपर्यंत सेवा पोहोचवत आहे. त्यामुळे इंडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात केवायसी प्रक्रिया पार पाडण्यास सक्षम आहे.
KYC म्हणजे काय?
KYC म्हणजे "तुमच्या ग्राहकांना जाणून घ्या." यामध्ये गुंतवणूकदाराची ओळख आणि पत्ता यांची पडताळणी केली जाते. यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असते. आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पत्ता (जसे की विजेचा बील, बँक पासबुक इत्यादी) जर एखाद्या व्यक्तीला म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही वित्तीय साधनांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
गुंतवणूकदारांचे केवायसी (KYC - Know Your Customer) घरी बसून पूर्ण करणे ही म्युच्युअल फंड हाऊसची जबाबदारी आहे. तथापि, ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी ग्राहकाने अर्ज करणे आवश्यक आहे. या सुविधेअंतर्गत, संबंधित म्युच्युअल फंड हाऊसने प्रतिनिधी घरोघरी पाठवून KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही सोय विशेषतः वृद्ध, आजारी किंवा अक्षम व्यक्तींना मोठा दिलासा देणारी ठरू शकते.
देशातील सामान्य लोकांची गुंतवणूक वाढावी यासाठी इंडिया पोस्टने डोअर टू डोअर केवायसी (KYC) सेवा सुरू केली आहे. या उपक्रमामुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळणार आहे, असे दळणवळण मंत्रालयाचे म्हणणे आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
स्टेप बाय स्टेप प्रोसेस
१. या योजनेचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
२. हे केवायसी अॅप किंवा म्युचल फंड कंपनीच्या साईडवर जाऊन करता येते.
३. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल जसेकी, नाव, पत्ता, नागरिकत्व, पॅन कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरावी लागते.
४. फॉर्मसोबत कागदपत्रांच्या प्रती सादर कराव्या लागतील.
५. यानंतर तुमच्या घरी एजंट किंवा सरकारी अधिकारी पाठवून केवायसी पूर्ण केली जाते.
Edited By - Purva Palande
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.