Government Scheme: ना व्याज, ना गॅरंटी, आता घ्या ५ लाखांचे लोन; सरकारने सुरु केली नवी योजना

Interest Free Loan Scheme: आता तरुणांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय लोन मिळणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ही नवीन योजना सुरु केली आहे.
Loan
LoanSaam Tv
Published On

अनेक तरुणांचे आपण स्वतः बिझनेस करावा, असे स्वप्न असते.परंतु पुरेसं भांडवल नसल्याने व्यवसाय सुरु करता येत नाही. त्यामुळे अनेकजण रिस्क घेतच नाही. भांडवल नाही म्हटल्यावर बँकेकडून लोन घेतले जाते. त्यावर तुम्हाला व्याजदरदेखील भरावे लागते. त्यामुळे अनेकजण लोन काढत नाही. परंतु आता सरकारने तरुणांसाठी नवीन योजना राबवली आहे. या योजनेत तुम्हाला कोणत्याही व्याजाशिवाय आणि गॅरंटीशिवाय लोन मिळणार आहे.

उत्तर प्रदेश सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. तरुणांना रोजगार मिळवा या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत उत्तर प्रदेश सरकारमधील कोणताही नागरिक व्यवसाय सुरु करु शकतात. या योजनेचं नाव मुख्यमंत्री युवा उद्दमी विकास अभियान आहे.

Loan
Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

योजनेचं उद्दिष्ट काय? (UP Government Scheme)

मुख्यमंत्री युवा उद्यमी अभियान योजनेचं उद्दिष्ट हे आहे की, राज्यातील नवीन तरुणांना आत्मनिर्भर करणे. त्यांना स्वतः चा व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणे. या योजनेत २१ ते ४० वयोगटातील तरुण अर्ज करु शकतात. राज्यात जास्तीत जास्त तरुणांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा, यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला msme.up.gov.in वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

जिल्हा उद्योग प्रोत्साहन आणि उद्यमिता विकास केंद्रात तुमच्या या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि फॉर्म पाठवला जाई,

यानंतर बँकेकडून लोन अप्रूव केले जाईल. त्यानंतर ते दिले जाईल.

पात्रता

या योजनेत २१ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

कमीत कमी ८वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.

विश्वकर्मा श्रम सन्मान, ODOP ट्रेनिंग स्कीम, एससी एसटी ट्रेनिंग स्कीम, यूपी कौशल्य विकास योजना किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून कौशल्यासंबंधित डिग्री प्राप्त केलेली असावी.

डिजिटल ट्रान्झॅक्शनमध्ये १ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन या हिशोबाने दर वर्षी २००० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेत नॅशनल बँक, ग्रामीण बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधून लोन दिले जाऊ शकते.

Loan
LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

५ लाखांपर्यंतचे लोन (5 Lakh Rupees Loan)

५ लाख रुपयांच्या लोनसाठी तुम्हाला कोणतेही व्याज देण्याची गरज नाही. ४ वर्षांमध्ये या लोनची रिकव्हरी केली जाणार आहे. या योजनेत तुम्हाला कोणतीही गॅरंटी देण्याची गरज भासत नाही. या योजनेत तुम्ही १० लाखांचेदेखील लोन घेऊ शकतात. ७.५ लाखांच्या लोनवर ५० टक्के व्याज अनुदान दिले जाणार आहे. ३ वर्षात हे लोन रिकव्हर केले जाणार आहे.

१० टक्के सब्सिडी मिळणार

उत्तर प्रदेश सरकार या योजनेत १० टक्के मार्जिन मनी देणार आहे. जर दोन वर्षांपर्यंत बिझनेस यशस्वी झाला तर ही रक्कम सब्सिडी म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे परत करण्याची गरज भासणार नाही.

Loan
Monthly Income Scheme : घरबसल्या महिन्याला ९००० रुपये कमवा; पोस्टाची खास योजना, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com