LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १ लाखांची पेन्शन मिळवा

LIC Jeevan Shanti Plan: एलआयसीच्या जीवन शांती योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला वर्षाला १ लाखांची पेन्शन मिळू शकते.
LIC Jeevan Shanti Scheme
LIC Jeevan Shanti SchemeSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या मासिक पगारातून काही रक्कम बाजूला काढून गुंतवणूक करतात. अनेक योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे भविष्यात पैशांची अडचण येणार नाही. तुम्ही एलआयसीच्या जीवन शांती प्लानमध्ये गुंतवणूक करु शकतात.एलआयसीचा हा रिटायरमेंट प्लान आहे. यामध्ये तुम्ही वर्षाला १ लख रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.

LIC Jeevan Shanti Scheme
Scheme: फक्त ४५६ रुपये गुंतवा, आयुष्य सुरक्षित करा, PMJJBY आणि PMSBY बद्दल A to Z माहिती

फक्त एकदा गुंतवणूक करुन मिळवा आयुष्यभराची पेन्शन (One Time Investment Give You Lifetime Pension)

जर तुम्हाला आता गुंतवणूक करायची असेल तर एलआयसीची ही योजना एकदम परफेक्ट आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करायची आहे. तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला किती परतावा मिळणार हे अवलंबून असते. तुम्हाला सेवानिवृत्तींतर पेन्शन किती मिळणार आणि किती नाही हे यावर अवलंबून असतं.

एलआयसीची ही योजना ३० ते ७९ वयोगटासाठी असणार आहे. या योजनेत कोणतेही रिस्क कव्हर केले जाणार नाही परंतु मिळणारा फायदा खूप मोठा असेल. या योजनेत तुम्ही डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल अॅन्युटी आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ असा ऑप्शन निवडू शकतात. जर कोणाला सिंगल प्लानमध्ये गुंतवणूक करायची तर ते त्यात गुंतवणूक करु शकतात.

एलआयसीच्या या योजनेत जर ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये जमा केले आणि पाच वर्षांसाठी ही रक्कम गुंतवली तर तुम्हाला दर वर्षी १,०१,८८० रुपये पेन्शन मिळणार आहे. सहा महिन्याला तुम्हाला ४९,९११ रुपये पेन्शन मिळणार आहे तर महिन्याला ८,१४९ रुपये पेन्शन मिळणार आहे.

LIC Jeevan Shanti Scheme
National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

न्यू जीवन शांती योजनेत व्याजदर बदलत असतात. या योजनेत तुम्ही १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात.जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करु शकतात. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर ही रक्कम नॉमिनीला दिली जाते.

LIC Jeevan Shanti Scheme
PM Poshan Scheme: प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत देणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com