Scheme
SchemeSaam Tv

Scheme: फक्त ४५६ रुपये गुंतवा, आयुष्य सुरक्षित करा, PMJJBY आणि PMSBY बद्दल A to Z माहिती

Government Schemes: केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यातील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत लाखो रुपयांचा विमा मिळतो.
Published on

सरकारी योजनेतील गुंतवणूक ही फायद्याची असते. सरकारी योजनेत जर गुंतवणूक केली तर तुम्हाला परतावा सुरक्षित परतावा मिळतो. आज आम्ही तुम्हाला अशा दोन योजनांबद्दल माहिती देणार आहोत. ज्या योजनांमध्ये तुम्ही खूप कमी पैसे भरुन तुम्हाला इन्श्युरन्स मिळतो. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना (PMSBY).

Scheme
Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! PPF, सुकन्या समृद्धी, FD बचत योजनांवरील नवीन व्याजदर जाहीर, वाचा सविस्तर

या दोन्ही योजनांमध्ये तुम्हाला वर्षात फक्त ४५६ रुपये गुंतवायचे आहेत. यामध्ये 436+20=456 रुपये जमा करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला वर्षाला पैसे भरायचे आहे. या दोन्ही योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही इन्श्युरन्सचा लाभ घेऊ शकतात.

1. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY)

ही सरकारी योजना आहे. या योजनेत १८ ते ५० वयोगटातील नागरिकांना २ लाखांपर्यंतचा जीवन विमा दिला जातो. यामध्ये प्राकृतिक, आकस्मिक किंवा मारामारी मृत्यू झाला तर कव्हर दिला जातो. या योजनेत तुम्हाला वर्षाला फक्त ४३६ रुपये प्रिमियम भरायचा आहे. हे पैसे दर वर्षाला ऑटो डेबिट होतात.

दोन लाखांचा क्लेम

या योजनेत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नॉमिनीला इन्श्युरन्स क्लेम मिळतो. १८ ते ५० वयोगटातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत मॅच्युरिटी कालावधी ५५ वर्षांचा आहे. दर वर्षी पॉलिसी रिन्यू करावी लागते. या योजनेत फक्त ४३६ रुपये भरावे लागतील. ही एक टर्म इन्श्युरन्स पॉलिसी आहे.

Scheme
Saving Schemes For Women : लाडक्या बहिणींसाठी गुंतवणुकीच्या खास ३ योजना; होईल तगडा फायदा, जाणून घ्या

2. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना २०१५ मध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला फक्त २० रुपयांचे प्रिमियम भरावे लागतात. या योजनेत जर पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा दिव्यांगत्व आले तर १ लाख रुपयांचा कव्हर मिळतो. या योजनेत १८ ते ७० वयोगटातील नागरिक अर्ज करु शकतात. या योजनेत दरवर्षी तुमच्या खात्यातून पैसे डेबिट केले जाते.

१ लाखांचा विमा

देशातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत एनरोलमेंट पीरियड १ जून ते ३१ मे आहे. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर तुम्हाला १ लाखांचा विमा मिळणार आहे. दरवर्षी पॉलिसी रिन्यू करावी लागते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

Scheme
APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! दररोज ७ रुपये गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com