Saving Schemes: सरकारचा मोठा निर्णय! PPF, सुकन्या समृद्धी, FD बचत योजनांवरील नवीन व्याजदर जाहीर, वाचा सविस्तर

Saving Schemesn Interest Rate: केंद्र सरकारने बचत योजनांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता बचत योजनांचे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहे.
Saving Schemes
Saving SchemesSaam Tv
Published On

प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात.सरकारी सेव्हिंग स्कीममधील गुंतवणूक ही खूप चांगली असते. या योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. या योजनेत व्याजदरही चांगले मिळते. दरम्यान, सरकारने आता बचत योजनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Saving Schemes
Accident Insurance Scheme: Zomato, Blinkit and Swiggy च्या कामगारांना मिळणार जीवन आणि अपघात विम्याचा लाभ, केंद्र सरकारचा निर्णय

भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापुढेही तुम्हाला सारखेच व्याजदर मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक करावी, हे या योजनांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजना लहान गुंतवणूकदार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या योजनांमध्ये तिमाही आधारावर व्याजदर निश्चित केले जाते. आता व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील दुसऱ्या तिमाहीत व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यामध्ये पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनांचा समावेश आहे.

Saving Schemes
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जूनचे पैसे आले, जुलैचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

योजनांचे व्याजदर (Scheme Interest Rates)

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) योजनेत तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samrudhhi Yojana) ८.२ टक्के व्याजदर मिळते. ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मदत करते.

सिनियर सिटिजन सेव्हिंग स्कीम योजनेत ८.२ टक्के व्याजदर मिळते. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आली आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate) या योजनेत तुम्हाला ७.७ टक्के व्याजदर मिळते.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट एफडीत ६.९ ते ७.५ टक्के व्याजदर मिळते.

किसान विकास पत्र योजनेत ७.५ टक्के व्याज दिले जाते. या योजनेत ११५ महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यावर पैसे डबल होतात.

महिला सन्मान बचत पत्र या योजनेत ७.५ टक्के व्याजदर मिळते. ही योजना महिलांसाठी आहे.

Saving Schemes
Pink E-Rikshaw Scheme: पिंक ई रिक्षा योजना आहे तरी काय? किती अनुदान मिळणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com