FD Rate: या बँकेत आहे तुमची एफडी; तर मिळणार अधिक व्याज; कुणाला मिळणार लाभ?

HDFC FD Interest FD Rate: एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. ५-१० बेसिस पॉइंट्सने ही वाढ केली जाणार आहे.
FD Rate
FD RateSaam Tv
Published On

अनेकजण आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित व्हावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेक लोक बँकांमध्ये एफडी करतात. या एफडीचा फायदा त्यांना खूप कालावधीसाठी होता. एफडीवर चांगला परतावा मिळतो. एचडीएफसी बँकांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी बँकेने एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. (HDFC Bank FD Interest Rate Increase)

FD Rate
Rule Change: UPI ते EPFO; आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बदलले हे ७ नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम

स्टेट बँक ऑफ इंडियाने ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. या योजनांमध्ये रेग्युलरपेक्षा १० बेसिस पॉइंटपेक्षा जास्त व्याजदर मिळते. एचडीएफसी बँकेनेदेखील बल्क डिपॉझिट म्हणजे ५ कोटी किंवा त्यापेक्षा जास्त परताव्यावर ५ ते १० बेस पॉइंट्सने सुधारणा करेल. (FD Interest Rate)

स्टेट बँकेने ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांच्या एफडीवर व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.५ ते १० बेसिस पॉइंटने हे व्याजदर वाढणार आहे. ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी स्टेट बँकेने योजनेची पुनर्रचना केली आहे. यामुळे बँकांमधील व्याजदर सुधारित करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरुन, डिसेंबरच्या मध्यापर्यंत बँक ठेवी ११.५ टक्क्यांच्या समान गतीने वाढत आहे.

FD Rate
PF: कोण कोणत्या कारणांसाठी काढता येणार PF चे पैसे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल झाल्यावर इतर बँकाही व्याजदर बदल शकतात. एफडीएफसी बँकेने इतर बँकांच्या तुलनेत बरोबरीने व्याजदरात बदल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

FD Rate
Government Scheme: लाडकी बहीण योजनेसारखेच 'या' योजनांचे पैसेही थेट बँक खात्यात जमा होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com