
प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ खाते हे असते. प्रत्येक महिन्याच्या कर्मचाऱ्याच्या पगाराची काही टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. कर्मचाऱ्याकडून आणि कंपनीकडून हे पैसे जमा केले जाते. पीएफ खात्यातील पैसे ही एक गुंतवणूक असते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला ही पीएफची रक्कम मिळते. तसेच यातील काही रक्कम ही तुमच्या पेन्शनसाठीदेखील दिली जाते. परंतु तुम्ही काही आप्तकालीन परिस्थितीतदेखील पीएफ काढू शकतात.
कोणत्या कारणांसाठी पीएफ काढू शकतात? (For These Reason You Can Withdraw PF Money)
भविष्यात स्वतः च्या किंवा मुलांच्या लग्नासाठी पैसे काढू शकतात. तसेच आप्तकालीन वैद्यकीय परिस्थितीत पैसे काढू शकतात. नवीन घर घेण्यासाठी किंवा घराचे बांधकाम करण्यासाठी तुम्ही पीएफचे पैसे काढू शकतात. गृहकर्जाची परतफेड करण्यासाठीही तुम्ही पीएफचे पैसे एकरकमी काढू शकतात. पीएफची रक्कम काढण्यासाठी कर्मचारी ईपीएफओचे पाच ते सात वर्षे सदस्य असणे आवश्यक आहे.
PF खात्यातील पैसे कसे होणार?
सर्वप्रथम तुम्ही ईपीएफओच्या पोर्टलवर जावे लागेल.
त्यानंतर यूएएन नंबर आणि पासवर्ड टाका.
त्यानंतर तुम्हाला आधार नंबरशी जोडलेल्या क्रमांकावर ओटीपी मिळेल.
यानंतर प्रोफाइल फेज ओपन होईल. त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिस हा ऑप्शन दिसेल.
त्यानंतर क्लेम या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर कर्मचाऱ्यांनी लिंक केलेला बँक अकाउंट नंबर टाकून माहिती भरावी.
यानंतर तुमच्या बँक खात्यात काही दिवसांनी पैसे जमा होतील.
या अंडरटेकिंगवर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाइन क्लेमवर क्लिक करा.
यानंतर नवीन सेक्शन ओपन होईल. त्यात अधिक माहिती भरा.
यानंतर तुम्हाला पत्ता, स्कॅन केलेला चेक आणि फॉर्म १५ भरावा लागले.
यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाल्यावर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.