EPFO Interest Rate : ईपीएफओ खातेधारकांना खास दिवाळी भेट; व्याजाची रक्कम मिळणार, चेक करा!

EPFO Interest 2022 - 23 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या खातेधारकांना खास दिवाळी भेट दिली आहे.
EPFO Interest Rate
EPFO Interest RateSAAM TV

EPFO Interest 2022 - 23 :

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या खातेधारकांना खास दिवाळी भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील व्याजाची रक्कम खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, या आर्थिक वर्षात ईपीएफओ खातेधारकांच्या खात्यामध्ये जमा रकमेवर ८.१५ टक्के व्याजदर (Interest Rate) दिला जात आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि अर्थ मंत्रालयाकडून ईपीएफओचे व्याजदर निश्चित केले जातात. यावर्षी सरकारने जून २०२३ मध्ये आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये व्याजदर घोषित केले होते. त्यानंतर आता सरकारने पीएफ खातेधारकांच्या खात्यांमध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आमच्या खात्यात कधीपर्यंत व्याजाची रक्कम जमा करणार आहात, अशी विचारणा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटवर अनेक यूजर्सकडून केली जात आहे. Sukumar Das या एक्स अकाउंटवरून व्याजाच्या रकमेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला ईपीएफओने उत्तर दिले आहे.

व्याजाची रक्कम खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व्याजापोटी देण्यात येणारी रक्कम खातेधारकांना यावर्षी मिळणार असून, कोणतेही नुकसान होणार नाही, असेही ईपीएफओकडून सांगण्यात आले.

PF बॅलेन्स कसा चेक कराल?

पीएफ खातेधारकांना जमा रकमेची माहिती मेसेज, मिस्ड कॉल, उमंग अॅप किंवा ईपीएफओच्या संकेतस्थळावरून मिळवू शकता. मेसेजद्वारे बॅलेन्स चेक करण्यासाठी ईपीएफओवर नोंदवलेल्या मोबाइल क्रमांकावरून 7738299899 यावर मेसेज पाठवू शकता.

011-22901406 या क्रमांकावरही मिस्ड कॉल पाठवून बॅलेन्स चेक करू शकता. ईपीएफओ संकेतस्थळाला भेट देऊन For Employees सेक्शनमध्ये जाऊन बॅलेन्स चेक करू शकता.

EPFO Interest Rate
Gold Investment : धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? गुंतवणूकीसाठी हे पर्याय ठरतील बेस्ट!

उमंग अॅपवर बॅलेन्स चेक करण्यासाठी आधी ते अॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करा. त्यानंतर ईपीएफओ सेक्शनला भेट द्या. सर्व्हिस आणि View Passbook सिलेक्ट करा. एम्प्लॉई सेन्ट्रिक सर्व्हिसवर जाऊन ओटीपीचा पर्याय निवडा. मोबाइलवर ओटीपी येईल तो टाका. काही मिनिटांतच ईपीएफओ पासबुक दिसू लागेल. त्यावर तुम्ही जमा रक्कम पाहू शकता.

EPFO Interest Rate
Festival Special Train: मामाच्या गावाला जाऊया...! दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट, वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com