Festival Special Train: मामाच्या गावाला जाऊया...! दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेकडून प्रवाशांना मोठं गिफ्ट, वाचा सविस्तर

Festival Special Express Train: गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वे स्थानकांत गर्दी उफाळलीये. त्यामुळे मध्य रेल्वेने नागरिकांच्या नागरिकांच्या सोयीसाठी फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्यात.
Festival Special Train
Festival Special TrainSaam TV
Published On

सुरज सावंत

Diwali Special Train:

दिवाळी सणानिमित्त सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आणि मनसोक्त फराळ खाण्यासाठी सर्वांचे पाय गावाच्या दिशेने वळले आहेत. गावी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने रेल्वे स्थानकांत गर्दी उफाळलीये. त्यामुळे मध्य रेल्वेने नागरिकांच्या सोयीसाठी फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्यात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Festival Special Train
Rain In AC Local Train: भर उन्हात एसी लोकलमध्ये पाऊस आला तरी कुठून? माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी शेअर केला VIDEO,एकदा पाहाच

मध्य रेल्वे दिवाळी सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल (मुंबई) आणि नांदेड दरम्यान ४ अतिरिक्त फेस्टिव्हल स्पेशल एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे.

०७६१६ फेस्टिव्हल स्पेशल-

दि. ११.११.२०२३ आणि दि. १८.११.२०२३ रोजी १३.२० वाजता पनवेलहून निघेल (२ फेऱ्या) आणि दुसर्‍या दिवशी ०४.०० वाजता नांदेडला पोहोचेल.

०७६१५ फेस्टिव्हल स्पेशल-

नांदेड येथून १०.११.२०२३ आणि दि.१७.११.२०२३ रोजी २३.०० वाजता निघेल (२ फेऱ्या) आणि दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता पनवेलला पोहोचेल.

थांबे कोणते आहेत?

कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा या स्थानकांत ट्रेन थांबणार आहेत.

संरचना:

२० आयसीएफ-

१ वातानुकूलित ३-टायर

११ स्लीपर क्लास

८ सामान्य द्वितीय श्रेणी गार्ड्स ब्रेक व्हॅनसह सेवा पुरवल्या जाणार आहेत.

फेस्टिव्हल स्पेशल ट्रेनमधून सुखरुप प्रवासासाठी आरक्षण बुकिंग देखील सुरू झाली आहे. दिवाळीमुळे फक्त रेल्वे नाही तर रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. दिवाळी सणामुळे मुंबई, पुण्याहून कोल्हापूर,सातारा, सांगली आणि कोकणात जाणाऱ्या लोकांची पुणे बंगळुरू महामार्गावर तोबा गर्दी उसळली आहे.

त्यामुळे खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्यात. काही ठिकाणी घाटात वाहने बंद पडली आहेत त्यांना बाजूला घेण्याचे कामही सुरू आहे. सध्या या महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.सातारा पोलिस जरी रस्त्यावर उतरून प्रयत्न करत असेल तरी मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

Festival Special Train
Shahapur Crime: कसारा घाटात फिल्मी स्टाईल थरार! वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com