Dhanshri Shintre
राज्यात कोट्यवधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे.
निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचे पात्रतेचे निकष कठोर करण्यात आले असून लाभार्थ्यांची तपासणी अधिक काटेकोरपणे केली जात आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतलेल्या महिलांवर सरकारने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
सरकारने लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमधून दिलेली रक्कम पुन्हा परत घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
धुळ्यात चौकशीत एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे उघड झाल्याने तिच्याकडून रक्कम परत घेण्यात आली.
तक्रारी आलेल्या भागांतील लाभार्थ्यांचे अर्ज आणि कागदपत्रे पुन्हा तपासून योजनेच्या निकषांची अंमलबजावणी केली जात आहे.
तक्रारींमुळे केशरी आणि पिवळे रेशनकार्ड वगळता उर्वरित सर्व अर्जांची पुनर्तपासणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
या दोन्ही रेशनकार्ड असलेल्या लाभार्थ्यांबाबत जर कोणी तक्रार केली तर त्यांचेही अर्ज तपासले जाणार आहेत. निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरविले जाणार आहे.
NEXT: लाडक्या बहिणींच्या पैशातून मकरसंक्रांतीला कुटुंबासाठी घरच्याघरी बनवा 'हे' गोड पदार्थ