Women Scheme: आता महिलांना करता येणार मोफत प्रवास, लाँच केलं सहेली स्मार्ट कार्ड; कोणाला होणार फायदा

Saheli Smart Card For Womens: आता महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. दिल्ली सरकारने नवीन सहेली स्मार्ट कार्ड लाँच केले आहे. यामध्ये महिलांना दिल्ली परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
Government Scheme
Government SchemeSaam Tv
Published On

आता महिलांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. यासाठी नवीन सहेल स्मार्ट कार्ड लाँच करण्यात आले आहे. दिल्ली सरकारने ही नवीन योजना सुरु केली आहे. नवी दिल्लीत महिला आणि तृतीयपंथी समुदायाला सार्वजनिक वाहनातून मोफत प्रवास करता येणार आहे. महिलांना सुरक्षित आणि चांगला प्रवास करता यावा, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

आता १२ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना आणि तृतीयपथींना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यांना सहेली स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. दिल्ली परिवहन निगम (DTC) आणि क्लस्टर बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.

Government Scheme
Crop Insurance Scheme: फळपिक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; राज्य सरकारचा निर्णय

सहेली स्मार्ट कार्ड काय आहे? (What Is Saheli Smart Card)

सहेली स्मार्ट कार्ड हे पूर्णपणे डिजिटल असणार आहे. यावर महिलांचे नाव आणि फोटो असणार आहे. हे स्मार्ट कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डअंतर्गत जारी केले जाणार आहे. यामुळे तुम्हाला आता तिकीट काढण्याची गरज भासणार नाही.

फक्त दिल्ली परिवहन विभागाच्या बसमधून मोफत प्रवास

हे सहेली स्मार्ट कार्ड फक्त दिल्ली (Delhi) परिवहन विभाग आणि क्लस्टर बससाठी असणार आहे. दुसऱ्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी सेवेसाठी तुम्हाला टॉप-अपची आवश्यकता असणार आहे. या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित शाखेत जाऊन केवायसी पूर्ण करावे लागणार आहे.

Government Scheme
ELI Scheme : मोदी सरकारची नवी योजना, कर्मचाऱ्यांना मिळणार ₹ १५०००, अट फक्त एकच, जाणून घ्या ELI स्कीमबद्दल

कागदपत्रे

सहेली स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, दिल्लीचे रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, बँक डिटेल्स याची माहिती आवश्यक आहे. यानंतर केवायसी पूर्ण झाल्यानंतर कार्ड महिलांच्या अधिकृत पत्त्यावर पाठवण्यात येईल. ही सेवा पेपरलेस आणि सुरक्षित असणार आहे.

Government Scheme
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com