
Delhi Metro Viral Videos: दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो, लखनऊ मेट्रो अशा अनेक शहरांतील मेट्रो प्रवास हा सामान्य जनतेसाठी आरामदायक आणि सुरक्षित मानला जातो. मात्र, अशा सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेट्रोमध्येच जर अचानक एखादा साप शिरला तर? नेमकं असंच काहीसं एका मेट्रो ट्रेनमध्ये घडलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एका मेट्रोच्या महिला कोचमध्ये अचानक एक साप (Snake) घुसल्याने तिथे प्रचंड घबराट निर्माण झाली. महिला प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाल. धक्कादायक म्हणजे काही महिला घाबरून जागच्या जागी ओरडू लागल्या, तर काही जणींनी थेट सीटवर चढून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये दिसतं की कोचमधल्या अनेक महिला सापाला पाहून इतक्या घाबरलेल्या आहेत की काहींनी चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला, तर काहीजणी एकमेकींना धरून उभ्या राहिल्या आहेत.
हा प्रकार दिल्ली (Delhi Metro) शहरातील मेट्रोचा आहे असे व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजत आहे. मात्र याची पुष्टी होऊ शकली नाही.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कोणतेही स्पष्ट स्थानिक चिन्ह, स्टेशनचं नाव दिसत नाहीत. त्यामुळे ही घटना दिल्ली, मुंबई, कोलकाता, लखनऊ यापैकी कुठल्या मेट्रोची आहे हे सांगता येत नाही. मेट्रो प्रशासनानेही या व्हिडिओवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मेट्रोमधील हा सापाचा व्हिडिओ इंस्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर (एक्स) या प्रसिद्ध सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना काही ठिकाणी मजेदार मीम्स शेअर केले आहेत, तर काहींनी मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एका युजरने कमेंटमध्ये म्हटलं की,''सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेट्रोमध्ये जर साप घुसतो, तर मग रिक्षा आणि बसच बरी!" तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, "या महिला जशा घाबरल्या होत्या, तसंच कोणताही सामान्य प्रवासी घाबरला असता. यावर त्वरित उपाय हवा."
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.