Devendra Fadnavis : कारवाई झालीच पाहिजे; विधानसभा लॉबीतील हाणामारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Vidhan Bhavan lobby clash Video: विधानसभा लॉबीतील हाणामारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कारवाईची मागणी केली.
Devendra Fadnavis news
Devendra Fadnavis newsSaam Tv
Published On

मुंबई : विधीमंडळाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर खळबळ उडाली आहे. या हाणामारीच्या घटनेनंतर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या आक्रमक मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी या हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सर्व परिसर येतो. त्यामुळे सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घ्यावी'.

'मला असं वाटतं की अशा प्रकारे एक तर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला निश्चित शोभणारं नाही. त्यामुळे यावर निश्चितपणे कारवाई झालीच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं.

Devendra Fadnavis news
Swachh Bharat Mission : पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा; सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या यादीत पटकावला ८ वा क्रमांक

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार दरेदर म्हणाले, 'मला याची अजिबात कल्पना नाहीये. अशी घटना घडली असेल तर निश्चित दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. ते अशी घटना घडली असल्यास त्याची योग्य माहिती घेतील. त्यावर पुढे काय कारवाई करायची हे ठरवतील'.

Devendra Fadnavis news
Extramarital affair Case : दोन मुलांच्या आईचे अनैतिक संबंध, बॉयफ्रेंडचा लग्नासाठी नकार; बलात्काराची तक्रार, कोर्टाने महिलेला फटकारले, नेमकं काय घडलं?

'कुठंतरी यावर निर्बंध टाकण्याची आवश्यकता आहे. ५-५० कार्यकर्ते अधिवेशन सुरू असताना येतात. याआधीही असा अनुभव आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने विधिमंडळ किंवा सरकार त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल. आम्हीही तशी मागणी करू, जेणेकरून असे प्रसंग रोखले जातील, असे दरेकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com