
सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत स्वच्छ शहरांच्या यादीत राज्यातील पुणे शहराचं नाव आलं आहे. पुण्याने स्वच्छ शहरांच्या यादीत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या २०२४ सालच्या अंतिम निकालात पुणे शहराला बहुमान मिळाला आहे.
देशभरातील दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हे मूल्यमापन करण्यात आले होते. गेली आठ वर्षे सलग इंदूर शहराने पहिल्या क्रमांकावर आपले वर्चस्व राखले आहे. त्याला सेव्हन स्टार रँकिंग ही प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रात नवी मुंबई महापालिका दरवर्षी पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवत असते. मात्र पुणे महापालिकेला गेल्या काही वर्षांत फारशी मोठी झेप घेता आली नव्हती. यंदा मात्र पुण्याने चांगली भरारी घेत आठव्या क्रमांकावर पोहोचत सकारात्मक प्रगती केली आहे.
१.इंदूर (मध्य प्रदेश) – सलग आठव्यांदा पहिला क्रमांक
२ सुरत (गुजरात) – दुसरे स्थान
३.नवी मुंबई (महाराष्ट्र) – तिसरे स्थान
२०१९ : ३७
२०२० : १५
२०२१ : ५
२०२२ : ९
२०२३ : ९
२०२४ : ८
दरम्यान, देशभरात स्वच्छ भारत अभियान मागील ९ वर्षांपासून राबवलं जात आहे. २०१६ साली ७३ शहरांसाठी अभियान राबवलं जात होतं. त्यानंतर हे अभियान ४५०० शहरांपर्यंत पोहोचलं. ४५ दिवस चाललेल्या मूल्यांकनामध्ये ३,००० हून अधिक प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी देशभरातील हजारो वॉर्डांना भेट दिली. तसेच ११ लाखांहून अधिक घरांचे निरीक्षण करून स्वच्छतेची खरी वास्तिवकता सादर केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.