wardha
wardha news Saam tv

Wardha : ऐकावं ते नवलच! शाळेत शिक्षकांची वानवा; सफाई कामगाराकडेच सोपवला शिकवण्याचा कारभार, वर्ध्यातील प्रकार

Wardha News : शाळेत शिक्षकांची वानवा असल्याने सफाई कामगाराकडेच शिकवण्याचा कारभार सोपवल्याची घटना घडली आहे. वर्ध्यातील एका शाळेत प्रकार घडला.
Published on

पराग ढोबळे, साम टीव्ही

वर्धा जिल्ह्यात पुलगाव नगरपरिषदेचा अजबच प्रकार समोर आला आहे. एकीकडे नागपूर जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेची शाळा चालवली जात आहे. दुसरीकडे मात्र पुलगाव येथे चक्क सफाई कामगाराला शिकवण्यासाठी सफाईसह अतिरिक्त कारभार म्हणून शिकण्यासाठी नियुक्त केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

wardha
Mumbai Local Train : साध्या लोकल इतकेच AC लोकलचे तिकीट दर होणार? राज्य सरकारची रेल्वे मंत्रालयाशी बोलणी सुरु

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने या अफलातून कारभाराविरोधात शिक्षण विभागाला पत्र दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणी लक्ष्मीबाई प्राथमिक शाळेत 60 च्या घरात विद्यार्थी आहे. तिथे एकच शिक्षक असल्यामुळे दुसऱ्या शाळेतून एका शिक्षकाला नियुक्ती देण्यात आली आहे. यासाठी शहीद भगतसिंग प्राथमिक शाळेत ३७ विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असल्याने त्यातील एकच शिक्षक राणी लक्ष्मीबाई प्रथमिक शाळेत बदली देऊन पाठवण्यात आले.

wardha
Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

नगर परिषद शाळेतील सफाई कामगाराला सफाई कामगारासोबत अतिरिक्त काम म्हणून शिकवण्यासाठी पाठवण्यात येत असल्याचा पत्र नगर परिषदेने काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल जात आहे. विशेष म्हणजे शिक्षकांची तडजोड करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा नगर परिषदेची आहे. तिथं मात्र 5 ते विद्यार्थी असून एक शिक्षक शिकवत आहे.. ही पर्यायी व्यवस्था असताना सफाई कामगाराला नियुक्त केलं.

wardha
Uddhav Thackeray-Eknath Shinde : शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये, दोघांत फक्त एका खुर्चीचं अंतर

मात्र अशा पद्धतीने सफाई कामगाराला जरी उच्चशिक्षित असला तरी अशी नियुक्ती करून एक प्रकारे शिक्षणाचा खेळ खंडोबा करण्याचा काम पुलगाव नगर परिषदेने करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोबे यांनी शिक्षण विभाग आणि शासनच्या संबंधित विभागाला पत्र पाठवून ही बाब निदर्शनास आणून दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com