Mumbai Local Train : साध्या लोकल इतकेच AC लोकलचे तिकीट दर होणार? राज्य सरकारची रेल्वे मंत्रालयाशी बोलणी सुरु

Mumbai local train update : AC लोकलचे तिकीट दर साध्या लोकलसारखे होण्यासाठी राज्य सरकारने केंद्रात बोलणी सुरु केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ac local train fare news
ac local train fareSaam tv
Published On

Mumbai Ac Local Train : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील सर्वसामान्यांचा प्रवास गारेगार होण्याची शक्यता आहे. मुंबईतील एसी लोकल ट्रेनचे तिकीट दर साध्या लोकल तिकीट दरासारखे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे बोलणी सुरु केल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

महाराष्ट्र विधीमंडळात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधीमंडळातील विधानभवनात मुंबई लोकल ट्रेनबाबत महत्वाचं भाष्य केलं.मुंबईत एसी लोकलला साध्या लोकलचे दर लावता येतील, याविषयी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा सुरु असल्याची महत्वाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. लोकल ट्रेनची गर्दी रोखण्यासाठी खासगी कंपनीच्या ऑफिसच्या वेळेबाबत निर्णय घेतला जाणार का, असा प्रश्न अतुल भातखळकरांनी विचारल्यानंतर प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.

ac local train fare news
Latur : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर विद्यार्थ्यांची भरली शाळा, काय संपूर्ण प्रकरण? वाचा

मुंबई लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेसह वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी मुंबई उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.

ac local train fare news
Wrestler Divorce : नात्याला कुणाची नजर लागली? सायना नेहवालनंतर आणखी एका खेळाडूचा घटस्फोट; लग्नाच्या दोन वर्षांनी संसार मोडला

दरम्यान, मुंबई लोकलमधील प्रवाशांच्य गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने महामुंबईतील सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. रेल्वेने यासाठी सर्व आस्थापनांना पत्र लिहिलं होतं. मात्र, रेल्वेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. रेल्वेला प्रतिसाद न मिळाल्याने आता भूमिका काय घेणार, याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com