Wrestler Divorce : नात्याला कुणाची नजर लागली? सायना नेहवालनंतर आणखी एका खेळाडूचा घटस्फोट; लग्नाच्या दोन वर्षांनी संसार मोडला

Wrestler Divya Kakran Divorce: सायना नेहवालनंतर पैलवान दिव्या काकारानने नवऱ्याशी घटस्फोट घेतला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला.
Wrestler Divya Kakran Divorce News
Wrestler Divya Kakran DivorceSaam tv
Published On

सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यपनंतर आणखी एका खेळाडूने घटस्फोट घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पैलवान दिव्या काकरानने पती सचिन प्रताप सिंहशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त करत घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.

अर्जुन पुरस्कार विजेता दिव्या काकरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, घटस्फोट हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे. यात भरपूर दु:ख,चिंता आणि त्याग करावा लागतो. ही गोष्ट सहज शेअर करण्यासारखी नाही. मात्र, तुमच्या पांठिब्यामुळे शेअर करणे आवश्यक वाटली'.

Wrestler Divya Kakran Divorce News
Retail Inflation: आनंदाची बातमी! महागाईने गाठला 6 वर्षातील नीचांकी स्तर, काय झालं स्वस्त?

दिव्याने पुढे म्हटलं की, 'आता हळू हळू सर्व ठीक होत आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकतं. कारण तुमच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडतात. आता मी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, असं आयुष्यात घटना घडत असतात'.

Wrestler Divya Kakran Divorce News
Solapur : सोलापुरात मोठा राडा; मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, नेमकं काय घडलं? VIDEO

घटस्फोटाच्या निर्णयाला आई-वडिलांनी पाठिंबा दिल्याचे दिव्याने सांगितलं. दिव्या काकरान प्रसिद्ध पैलवान आहे. दिव्याने अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं नेतृत्व केलं आहे. दिव्याने घेतलेल्या निर्णयाने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. दिव्या काकरान सध्या नोएडामध्ये तहसीलदार पदावर काम करत आहे. दिव्या काकरानचं २१ फेब्रुवारी २०२३ रोजी मेरठमध्ये जिम ट्रेनर सचिन प्रताप सिंहसोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या एका वर्षाआधी दिव्या सचिनसोबत रिलेशनमध्ये होती. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर राज्य सरकारने दिव्याला तहसीलदर पद दिलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पती पारूपल्ली कश्यपला घटस्फोट दिला. सायना रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर घटस्फोटाच्या निर्णयाची माहिती दिली. दोघांचा सात वर्षांचा संसार मोडला. दोघेही बॅडमिंटनपटू आहेत. सायनाने एक पोस्ट शेअर घटस्फोट घेतल्याची माहिती दिली. दोघांचं गोपीचंद अकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतली. दोघांमध्ये आधी चांगली मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

Wrestler Divya Kakran Divorce News
Shashikant Shinde : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, VIDEO

सायना आणि पारुपल्ली यांचं लग्न १४ डिसेंबर २०१८ साली झालं होतं. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्माला आलेली सायना ही पारुपल्लीपेक्षा ३ वर्ष लहान आहे. लग्नाच्या वेळी पारुपल्ली ३१ तर सायना नेहवाल २८ वर्षांचा होता. सायनाने ३० व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली होती. तिने २०२० साली भाजप पक्षात प्रवेश केला.

Wrestler Divya Kakran Divorce News
Akola : सहकारी महिलेला शरीर सुखाची मागणी, सरकारी कर्मचारी गोत्यात; ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेनंतर ५ तासांत कारवाई

सायना आणि पारुपल्ली यांचं लग्न १४ डिसेंबर २०१८ साली झालं होतं. हरियाणाच्या हिसारमध्ये जन्माला आलेली सायना ही पारुपल्लीपेक्षा ३ वर्ष लहान आहे. लग्नाच्या वेळी पारुपल्ली ३१ तर सायना नेहवाल २८ वर्षांचा होता. सायनाने ३० व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली होती. तिने २०२० साली भाजप पक्षात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com