Akola : सहकारी महिलेला शरीर सुखाची मागणी, सरकारी कर्मचारी गोत्यात; ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेनंतर ५ तासांत कारवाई

Akola news : ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेनंतर सहकारी महिलेला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यावर ५ तासांत कारवाई केली आहे. अकोल्यातील ही घटना आहे.
Akola News
akola Saam tv
Published On

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आलंय. अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यलयात आमदार देशमुख यांचे 5 तासांपासून ठिय्या आंदोलन सुरु होतं. अधिकारी राजेंद्र इंगळे आणि दत्तात्रये कपिले यांच्यावर निलंबनाच्या कारवाईच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं. अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय कार्यलयाचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. तर उपविभागीय अधिकारी दत्तात्रये कपिले यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. तसा प्रस्ताव अमरावती विभागाकडं पाठवण्यात आला आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांवर मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेकडं शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप होता. या दोघांना पदावरून तातडीने निलंबीत करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचं 4 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू होतं.

Akola News
Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीयाचे शाखा अभियंता राजेंद्र इंगळे यांच निलंबन झालंय. या निलंबनाच्या कारवाईनंतर ठाकरेंच्या शिवसेने आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आंदोलनातं मोठ्या सख्येने ठाकरेंच्या शिवसेनेने प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता गव्हाणकर यांच्या कक्षात ठिय्या सुरु होता. त्यांना घेराव घातला होता.

Akola News
Famous Actress Death : कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन सृष्टीत शोककळा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप

दरम्यान, या प्रकरणात लक्षवेधी मांडू न देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला होता. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांवर हा आरोप गंभीर आरोप देशमुखांनी आंदोलनादरम्यान केला होता. कारण, आपण लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप देशमुख यांनी केला. कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचं स्पष्टपणे देशमुख म्हणाले.

Akola News
Beed Crime : सरपंचपदाचा राजीनामा का देत नाही? महिलेवर १५ ते २० जणांचा जीवघेणा हल्ला; बीडच्या परळीत खळबळ

अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं देशमुख म्हटले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केला होता. वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पीडित महिलेने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com