Famous Actress Death : कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली; प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, मनोरंजन सृष्टीत शोककळा

Kang Seo-Ha Passed Away : कोरियातील प्रसिद्ध अभिनेत्रीची अखेर कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. अभिनेत्री कांग सियो-हा हिचं वयाच्या ३१ व्या वर्षी निधन झालं.
Kang Seo-Ha
Kang Seo-Ha Passed Away Saam tv
Published On

Kang Seo-Ha Passed Away: कोरियन मनोरंजन सृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. कोरियनमधील प्रसिद्ध अभिनेत्री कांग सियो-हा हिचं निधन झालं आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाने तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कोरियातील माध्यमांनी कांग सियो-हा हिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जीवघेण्या आजाराशी झुंज देताना अभिनेत्रीने वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

स्पोर्ट्स क्विंगयांगने कोरियन अभिनेत्री कांग सियो-हा हिच्या निधनाला दुजोरा दिला आहे. अभिनेत्री कांगवर १६ जुलै रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अभिनेत्री कांगच्या निधनाच्या वृत्ताने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी कांग सियो-हा हिला सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

कांग सियो-हा हिच्या निधनाच्या वृत्तावर तिच्या कुटुंबीयातील सदस्याने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं की, 'प्रिय बहीण, मला विश्वास होत नाही. इतकं सारं दु:ख सहन करत असतानाही तू माझी चिंता करत होती. काही महिन्यापर्यंत तुला व्यवस्थित खाता पिता येत नव्हतं. परंतु तू माझ्या खाण्यापिण्याचा खर्च उचलत होती'.

'माझी एंजेल लवकरच सोडून गेली. दररोज गोळ्या औषधे खात असताना, सर्व सहन करताना परिस्थिती वाईट होऊ दिली नाही. मला अतिशय दु:ख होत आहे. तू खूप सहन केलं. तू जिथे असशील, तिथे खूश राहशील. सर्व वेदनेपासून दूर राहशील, असेही तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

Kang Seo-Ha
Shocking : हॉस्टेलमध्ये घुसून मुलींवर अत्याचार; आरोपी लोकांच्या तावडीत सापडला, पोलीस ठाण्यात हत्येचा थरार

दरम्यान, कांग सियो-हा ही कोरियन सिनेमा इंडस्ट्रीमध्ये भरपूर प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने अनेक नाटकात काम केलं आहे. फर्स्ट लव अगेन, नोबडी नोज, फ्लावर्स ऑफ द प्रिजन, थ्रू द वेव्स आणि गर्ल डिटेक्टिक्स या सारख्या नाटकांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कांगा सिया-हा ही 'द नेट' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र होती. या सिनेमात किम सियो-हो आणि पार्क ग्यू यंग मुख्य भूमिकेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com