Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक खुलासा

Mahadev Munde Case update: महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. या प्रकरणात वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याने धक्कादायक खुलासा केलाय.
Beed
Beed newsSaam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह मुलाचा सहभाग आहे. तसेच सायको किलर गोट्या गीतेचा सहभाग असल्याचा आरोप विजयसिंह बाळ बांगर यांनी केला आहे. विजयसिंह बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी वाल्मिक कराड, त्याचा मुलगा आणि गोट्या गीतेवर गंभीर आरोप केले.

Beed
Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आज सकाळी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात यापूर्वी धक्कादायक खुलासे करणारे वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.

Beed
Maharashtra Politics : ठाकरे बंधूंना मोठा झटका; मुंबईत एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, मिळाली आंबेडकरांची साथ

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आज पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या मुलाचा आणि गोट्या गितेचा हात असून गोट्या गिते हा सायको किलर आहे. त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे, असं विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी म्हटलं आहे.

Beed
Pune Bhide Bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

परळीतील माजी उपसरपंचाचा कराडबाबत धक्कादायक दावा

परळी मतदारसंघात तुतारीचे काम केले म्हणून वाल्मिक कराड यांनी माझी सुपारी दिली. दोन वेळा मारहाण केली. पण मी त्यातून वाचलो. आता माझा जीव घेऊ शकतात म्हणत बीडच्या लिंबगाव येथील माजी उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. तर पोलीस प्रशासनही यात आरोपीला मदत करत आहे. आता उपोषणाच्या ठिकाणी बसल्यावरही पोलीस अधिकाऱ्यांचे धमकीचे फोन येत असल्याचाही खळबळजनक आरोप तानाजी धुमाळ यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com