Maharashtra Politics : ठाकरे बंधूंना मोठा झटका; मुंबईत एकनाथ शिंदेंची ताकद वाढली, मिळाली आंबेडकरांची साथ

eknath shinde and anandraj ambedkar alliance : एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना आंबेडकरांची साथ मिळाली आहे.
eknath shinde and anand raj ambedkar alliance
eknath shinde news Saam tv
Published On

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शह देण्यासाठी मुंबईत मोठा डाव आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेच्या आनंदराज आंबेडकर यांच्याशी बुधवारी युती केली आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर आणि एकनाथ शिंदे यांची हातमिळवणी झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीमधील शिंदे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेसाठी देखील शिंदे गटाने मोठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिकेच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील अनेक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांची मुंबईत ताकद वाढल्याचं बोललं जातंय. मात्र, ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर एकनाथ शिंदे यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण झाल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर नवा भिडू सोबत घेतल्याने एकनाथ शिंदे यांनी मुंबईत मोठा डाव टाकला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले आनंदराज आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग मुंबई आणि महाराष्ट्रात आहे. आनंदराज आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि भाजपच्या नवनीत राणा उभ्या होत्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी आनंदराज आंबेडकर यांचा पराभव केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या आनंदराज आंबेडकरांनी आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिली आहे.

eknath shinde and anand raj ambedkar alliance
Akola News : कापसाच्या सघन लागवडीचा 'अकोला पॅटर्न'; 'सघन' पद्धत आणि पारंपारिक पद्धतमधील फरक काय?

कोण आहेत आनंदराज आंबेडकर?

आंनदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज हे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com