ITR Filling: आयटीआर फाइल करण्यासाठी मुदत वाढवली; शेवटची तारीख काय? वाचा सविस्तर

ITR Filling 2025 Last Date: आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख यावर्षी बदलण्यात आली आहे. आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय आहे हे जाणून घ्या.
ITR Filling
ITR FillingSaam Tv
Published On
Summary

आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय

प्रत्येक उत्पन्न गटासाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे

आयटीआर फाइल करण्यास सुरुवात होऊन बरेच दिवस झाले आहेत. अनेक करदात्यांनी आतापर्यंत आयटीआर फाइल केले आहेत. अनेकांचे रिफंडदेखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन यावर्षी बदलण्यात आली आहे. त्यामुळे आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय याबाबतचा प्रश्न करदात्यांना पडला आहे.

ITR Filling
ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय? (ITR Filling 2025 Deadline)

लाखो करदाते दरवर्षी आयटीआर फाइल करतात. दरवर्षी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. मात्र, यंदा ही तारीख वाढवून देण्यात आली आहे. यंदा आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे तुम्ही सप्टेंबरपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. जसे वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी वेगवेगळा आयटीआर फॉर्म आहे. तसेच प्रत्येक उत्पन्न गटासाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख वेगवेगळी आहे.

कंपन्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख काय?

ज्या करदात्यांना खात्यांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. त्या करदात्यांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. कंपन्यांचे ऑडिट होते. तुम्ही ऑडिट रिपोर्ट ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करु शकतात.

ITR Filling
ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

आंतरराष्ट्रीय व्यव्हारांसाठी आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख

आंतरराष्ट्रीय व्यव्हरांसाठी आयकर रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. या नागरिकांना ऑडिट रिपोर्ट ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जमा करणे अनिवार्य आहे.

बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख

जर तुम्ही आयटीआर फाइल करण्यास विसरलात तर बिलेटेड आयटीआर फाइल करु शकतात. बिलेटेड आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे.

ITR Filling
ITR Filling 2025: एक फॉर्म भरा अन् TDS रिफंड मिळवा, ITR ची गरज नाही, सरकारचा मोठा निर्णय
Q

ITR चा फुलफॉर्म काय?

A

ITR चा फुलफॉर्म इन्कम टॅक्स रिटर्न आहे. दरवर्षी करदाते इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करतात.

Q

आयटीआर कोण फाइल करतात?

A

सर्वांनी आयटीआर फाइल करणे गरजेचे आहे. १२ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांनी आयटीआर फाइल करणे अनिवार्य आहे.

Q

कोणत्या उत्पन्नापर्यंत टॅक्स भरावा लागत नाही?

A

यंदा बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आले आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न असल्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार नाही.

Q

प्रत्येक उत्पन्न गटासाठी आयटीआर वेगवेगळा असतो का?

A

प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळा आयटीआर फाइल करावा लागतो. सॅलरीड करदात्यांना आयटीआर २ फाइल करावा लागतो. कंपन्यांसाठी वेगळा आयटीआर फॉर्म असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com