Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वयाच्या २१व्या वर्षी UPSC क्रॅक; IAS आस्था सिंह कोण आहेत?

Success Story of IAS Astha Singh: आस्था सिंह यांनी वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. सर्वात तरुण आयएएस म्हणून त्यांनी विक्रम रचला आहे.

Siddhi Hande

आपण कोणतीही गोष्ट परत आणू शकतो परंतु वेळ कधीच परत मिळत नाही, असं म्हणतात. योग्य वेळी जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर तुम्हाला भविष्यात कधीच कोणतीही अडचण येणार नाही. तरुण वयात मुलांच्या मनात करिअरबाबत अनेक प्रश्न असतात. करिअरसाठी कोणता मार्ग निवडायचा. ज्या वयात आपल्याला काय करायचे कळत नाही, त्या वयात आस्था सिंह यांनी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. २१ व्या वर्षी त्या आयएएस ऑफिसर झाल्या आहेत.

आस्था सिंह (IAS Astha Singh) या देशातील सर्वात तरुण आयएएस ऑफिसर आहेत. त्या मूळच्या पंजाबच्या रहिवासी आहेत. त्यांनी २१ व्या वर्षी यूपीएससी क्रॅक करुन स्वतः च्या नावावर एक नवीन विक्रम रचला आहे. आस्था या मूळच्या पंजाबच्या आहेत. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ६१ रँक प्राप्त केली.

आस्था सिंह या पंजाबच्या जीरकपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण मध्य प्रदेशमधील भोपाळच्या पंचकुला येथून केले. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकोनॉमिक्स डिग्री प्राप्त केली. त्यांनी २०२४ मध्ये एचपीएससी एचसीएस परीक्षा पास केली होती. त्या हरियाणा सरकारमध्ये असिस्टंट एक्साइज आणि टॅक्सेशन ऑफिसर म्हणून ट्रेनिंगदेखील घेत होत्या.

आस्था या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या.त्यांनी १२वी झाल्यावर ऑफिसर होण्याचे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी इकोनॉमिक्समध्ये बीए करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे कॉलेज कोरोना काळाज झाले.

त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. एका वर्षासाठी त्यांनी खूप मन लावून अभ्यास केला. त्यांनी कोणत्याही क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे संपूर्ण देशभरात कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT